पंतप्रधानांनी फोन करणे हे सुवर्ण पदकापेक्षाही मोठे

पंतप्रधानांनी फोन करणे हे सुवर्ण पदकापेक्षाही मोठे

गेले दोन महिने जगभर ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकचा माहोल आहे. टोकियोमध्ये पार पडलेले ऑलिम्पिक आणि आत्ता सुरू असलेले पॅरालिम्पिक खेळ हे खूप ऐतिहासिक ठरत आहेत. कोविड महामारीच्या पश्चात या जागतिक पातळीच्या क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

भारताच्या दृष्टीनेही या स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठरत आहेत. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पण यात सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती ठरली असेल तर प्रत्येक यशाच्या आणि अपयशाच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना व्यक्तिगत फोन करून त्यांच्याशी संवाद साधणे आणि प्रोत्साहन देणे.

हे ही वाचा:

भारतीय संघाच्या चिंता वाढल्या! रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव

जावेद अख्तर यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल

सावधान! गैर मुस्लिम मुलींना हिजाबच्या जाळ्यात ओढण्यासाठी सुरु आहेत कुरापती

मोदींच्या या वर्तनातून खेळाडूंना जोश आणि समाधान प्राप्त होतच आहे. पण देशातील नागरिकांनाही पंतप्रधानांच्या या कृतीचे कौतुक वाटत आहे. पण भारतीय पंतप्रधानांची ही कृती परदेशी खेळाडूंनाही भुरळ पडत आहे. भारताचा कांस्य पदक विजेता ॲथलिट शरद कुमार यांनी नुकतेच या संबंधीचे भाष्य केले आहे.

शरद कुमार याने उंच उडी या क्रीडा प्रकारात भारतासाठी कांस्य पदक पटकावले आहे. शनिवारी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी शरदने संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले त्याच्या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या ज्या खेळाडूंना सुवर्ण पदक पटकावले त्या स्टीव ग्र्युने ही गोष्ट बोलून दाखवली.

तुमच्या देशाचे प्रमुख देशाचे पंतप्रधान तुम्हाला फोन करतात ही खूप मोठी बाब आहे. सुवर्ण पदकापेक्षाही मोठी! अशा भावना ग्र्युने व्यक्त केल्याचे शरद कुमार यांनी बोलताना सांगितले. यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा सरकारी दृष्टिकोन कशा प्रकारे बदलला आहे आणि खेळाडूंच्या सर्व गरजांकडे भारत सरकार कशाप्रकारे लक्ष देते यावरही त्याने प्रकाश टाकला.

Exit mobile version