“भारताच्या कोविड विरुद्धच्या लढ्याचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल”

“भारताच्या कोविड विरुद्धच्या लढ्याचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल”

जागतिक महामारी कोरोना विरुद्धच्या लढाईत नुकताच भारताने २०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. भारताने अवघ्या १८ महिन्यांत हा आकडा पार केला. १६ जानेवारी २०२१ रोजी या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. यानंतर जगभरातून भारताचे कौतुक होत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहलेल्या पत्रात सर्व लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं आहे. भारताने नुकताच २०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला. या पत्रात नरेंद्र मोदी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. “या नागरिकांच्या प्रयत्नांमुळे सर्व शक्य झाल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. साथीच्या संकटाच्या काळात भारताच्या या अभूतपू्र्व कामगिरीचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. या पत्रासंबंधीचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

हे ही वाचा:

शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र

बँक कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला; बँकेतून १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास

मंत्रिपद देतो म्हणत भामट्यांनी आमदारांकडे मागितले १०० कोटी

राहुल शेवाळे शिवसेनेचे गटनेते, तर भावना गवळी मुख्य प्रतोद

देशात कोरोना लसीकरणाने नवा विक्रम केला असून, लसीकरणाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात २०० कोटींहून अधिक कोविड लस देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केले होते. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, “भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला! २०० कोटी लसीच्या डोसचा आकडा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन. भारताच्या लसीकरण मोहिमेत ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांचा अभिमान आहे. यामुळे कोविड-१९ विरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ मिळाले आहे.”

Exit mobile version