पंतप्रधान मोदी ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमा पाहणार; संसदेत विशेष स्क्रीनिंग

२००२ मधील गोध्रा ट्रेन दुर्घटनेनंतर घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकणारा सिनेमा

पंतप्रधान मोदी ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमा पाहणार; संसदेत विशेष स्क्रीनिंग

अयोध्येहून निघालेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या दोन बोगींना आग लागून घडलेल्या घटनेचे सत्य उघड करणारा अभिनेता विक्रांत मॅसी याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली. सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या या सिनेमाचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात असून अनेक राजकीय नेत्यांनीही या चित्रपटासाठी गौरवोद्गार काढले आहेत. अशा या २००२ मधील गोध्रा ट्रेन दुर्घटनेनंतर घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या सिनेमाच्या विशेष शोचे आयोजन संसदेत करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार, २ डिसेंबर रोजी संध्याकाळी संसदेत ४ वाजता ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहणार आहेत. संसदेच्या बालयोगी सभागृहात ‘द साबरमती रिपोर्ट’चे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले जाणार आहे. याआधी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा चित्रपट पाहिला होता आणि सत्य समोर आणण्याचा हा एक चांगला प्रयत्न असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की, “दुर्दैवाने लोकांच्या एका वर्गाने सत्याचे खोट्यात आणि खोट्याचे सत्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने सत्य नेहमीच बाहेर येते आणि आता ते सर्वांसमोर येत आहे.”

धीरज सरना दिग्दर्शित ‘द साबरमती रिपोर्ट’ या सिनेमात २००२ रोजी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या डब्यांना लागलेल्या आगीच्या घटनेमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेत अयोध्येहून परतणाऱ्या ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा..

बांगलादेशने इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारली

जो बायडन यांचा यू-टर्न; शस्त्र आणि कर फसवणूक प्रकरणात मुलाला केले माफ

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ला दणका देत ‘आप’चा एकला चलोचा नारा

सिब्बल, पित्रोडांसोबत दिसलेला शुजा पुन्हा ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करतोय!

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनीही या सिनेमाचे कौतुक केले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले होते. सत्य कायमचे अंधारात राहत नाही, असे ते म्हणाले होते.

Exit mobile version