पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मे रोजी काशीमध्ये रोड शो आणि १४ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रसंग ऐतिहासिक करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात सुमारे २२ तास राहणार आहेत.
काशीला लघु भारतही संबोधले जाते. याच संकल्पनेवर आधारित रोड शो आयोजित केला जाणार आहे. त्यानुसार संपूर्ण कार्यक्रम आखला जात आहे. रोड शोमध्ये जेवढी व्यासपीठे उभारली जातील, ती विविध जाती-धर्म आणि समुदायांतील कलाकारांच्या मदतीने सजवली जातील. त्यांची वेषभूषाही पारंपरिक असेल.
हे ही वाचा:
‘निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला लोकानुनयाची गरज नाही’!
पावसाच्या व्यत्यतात कोलकात्याकडून मुंबईचा पराभव!
सूर्यावर दोन मोठे स्फोट; पृथ्वीच्या संपर्क यंत्रणेला फटका बसण्याची शक्यता!
अमित शहा आणि योगी आदित्यनाथ दशाश्वमेध येथील गंगा नदीच्या आरतीत सहभागी झाले. तेव्हा प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरीही उपस्थित होते. आरतीनंतर लोकांना घाटावर आयोजित काशीच्या विकासावरील ड्रोन शोही दाखवण्यात आला.
दशाश्वमेध घाटासमोर तिसऱ्या दिवशी शनिवारीही भव्य ड्रोन शो झाला. या माध्यमातून गेल्या १० वर्षांत मोदी यांच्या प्रयत्नांनी काशीमध्ये झालेला विकास दाखवण्यात आला. या कलाकृतीमध्ये बाबा विश्वनाथाच्या डमरूसह प्रसिद्ध गंगा आरती, विश्वनाथ कॉरिडोअर, वंदे भारत ट्रेन यांसारखे प्रकल्प दाखवून भाजपला मत देण्याचे आवाहन करण्यात आले.
ड्रोन शोच्या माध्यमातून काशीमध्ये केलेल्या विकासाचा लेखाजोखा मांडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात काशीने आधुनिकतेचे स्वरूप धारण केल्याचे दाखवण्यात आले. केवळ काशीमधील रहिवासीच नव्हे तर, देशविदेशातील नागरिक हा विकास पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यामुळेच रोज लाखो भाविक येथे येतात.
काशी विश्वनाथ कॉरिडॉर, नमो घाट, रस्त्यांचे रुंदीकरण, रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटर, टीएफसी, बनारस रेल्वे स्थानक, कँट रेल्वे स्थानक, वाराणसी रेल्वे स्थानक, रिंग रोड, आरोग्य आदी क्षेत्रांतील विकासकामे काशीमध्ये झाली आहेत.