दिल्लीतल्या ४५० पोलिसांना पंतप्रधानांकडून स्नेहभोजन

जी-२० परिषदेदरम्यान कडेकोट सुरक्षा ठेवल्याबद्दल होणार कौतुक

दिल्लीतल्या ४५० पोलिसांना पंतप्रधानांकडून स्नेहभोजन

जी २० शिखर परिषद कोणतीही अनुचित घटना न घडता यशस्वीरीत्या पार पडली. जगभरातून मोठमोठे नेते उपस्थित असतानाही सुरक्षेत, बंदोबस्तात कोणतीही हयगय झाली नाही. याचे सर्वस्वी श्रेय जाते ते दिल्लीच्या पोलिस कर्मचाऱ्यांना. त्यांच्या या अतुलनीय कार्याचे, मेहनतीचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच त्यांच्यासोबत रात्री भोजनाचा आस्वाद घेणार आहेत.

 

शिखर परिषद यशस्वी पार पडल्याबद्दल, तसेच सुरक्षेबाबत कोणतीही हयगय न केल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे कौतुक केले जाणार आहे. या भोजन समारंभाला सुमारे ४५० पोलिस कर्मचारी उपस्थित असतील. या आठवड्यात कधीही हा भोजन समारंभ होईल.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ देशभरातील पाच शहरांत प्रदर्शित करणार

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध

‘इंडिया’ गट काही टीव्ही अँकरवर बहिष्कार घालणार

बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन

जी २० शिखर परिषदेदरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. प्रत्येक पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्याचे योगदान यात आहे. तरीही त्यातही काहींनी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवून उत्तम कामगिरी बजावली आहे. अशा शिखर परिषदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची नावे दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी काढली आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

 

सर्वांत मोठी जी-२० शिखर परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. प्रत्येक कार्यक्रमाची अचूक अंमलबजावणी झाली. प्रत्येक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता. सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही हलगर्जी दिसली नाही. यात दिल्ली पोलिसांच्या सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे योगदान तसेच कामाप्रति निष्ठा दिसून आली. हे केवळ देशाप्रति असलेल्या सामायिक भावनेमुळेच शक्य झाले,’ असे पोलिस प्रमुखांनी एका अधिकृत आदेशात म्हटले आहे.

 

९ आणि १० सप्टेंबर रोजी झालेल्या जी २० शिखर परिषदेत ३० हून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच, युरोपियन युनियनचे अधिकारी, अतिथी देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या १४ प्रमुखांनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती. या दरम्यान हे प्रमुख केवळ जी२० परिषदेला उपस्थित नव्हते तर त्यांनी काही पर्यटनस्थळीही भेट दिली होती. त्यामुळे संपूर्ण दिल्ली शहराला छावणीचे रूप आले होते.

Exit mobile version