‘पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे चार तुकडे करतील’

भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा दावा

‘पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे चार तुकडे करतील’

केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी दावा केला की, २०२५ नंतर पृथ्वीवर “पाकिस्तान” नावाचा कोणताही देश शिल्लक राहणार नाही. देवघर जिल्ह्यातील महेशमारा रेल्वे हॉल्ट स्टेशनच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना निशिकांत दुबे म्हणाले की, याच वर्षात पाकिस्तान चार भागांत विभागला जाईल. त्यांनी सांगितले की, पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या भूमीतून दहशतवाद्यांना “मिट्टी में मिला देंगे” असे जे वक्तव्य केले आहे, त्याचा परिणाम दूरगामी होईल.

भाजप खासदार म्हणाले, “पाकिस्तानने काश्मीरमधील आपला जो भाग बळकावला आहे, तो तर आपण परत घेऊच, शिवाय पाकिस्तानाचे विभाजन करून बलुचिस्तान, पख्तूनिस्तान आणि पंजाब अशा स्वतंत्र देशांची निर्मिती केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करून दाखवतील. मी पूर्ण खात्रीने हे सांगतो. जर पाकिस्तान यावर्षानंतर विभाजित झाला नाही, तर तुम्ही म्हणू शकता की भारतीय जनता पक्षाचे लोक खोटे आश्वासन देतात.”

हे ही वाचा:

पाकिस्तानी, पॅलिस्टिनी झेंड्यावरून मुस्लिम जमाव अस्वस्थ;हिंदू संस्थेच्या आंदोलकांवर हल्ला

अंत्यसंस्काराचा खर्च टाळण्यासाठी वडिलांचा मृतदेह दोन वर्ष ठेवला कपाटात!

मणिपूरमध्ये १० दहशतवाद्यांना अटक!

पहलगाम हल्ला : काँग्रेसचे नेते राशिद अल्वी म्हणतात हा फाळणीचा परिणाम

ते पुढे म्हणाले, “पाकिस्तान संपवला जाईल”, हीच मोदींची हमी आहे. ह्याच विश्वासावर ते देशाचे पंतप्रधान झाले आहेत. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना निशिकांत दुबे म्हणाले की, “पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थानातील नागरिकांना, विशेषतः हिंदूंना टार्गेट करून ठार मारले आहे. मोदी सरकार हा बदला घेतल्याशिवाय थांबणार नाही.”

रेल्वे हॉल्टच्या उद्घाटनाच्या आधी माध्यमांशी बोलताना भाजप खासदार म्हणाले की, देशाचे नेतृत्व आज अशा पंतप्रधानांच्या हाती आहे, ज्यांची क्षमता आणि ताकद संपूर्ण जगाला ज्ञात आहे. त्यांनी बिहारच्या भूमीतून स्पष्टपणे सांगितले आहे की दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना जमिनीत गाडले जाईल. याचा परिणाम असा झाला आहे की पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा संपूर्ण परिवार परदेशात पळून गेला आहे.

Exit mobile version