सामान्य नागरिकांना त्रास न देता मोदींचा निघाला ताफा! झाले कौतुक…

सामान्य नागरिकांना त्रास न देता मोदींचा निघाला ताफा! झाले कौतुक…

सर्वसाधारणपणे राजकीय नेत्यांच्या गाड्यांचे ताफे निघाले की, सगळे रस्ते बंद केले जातात आणि त्यातून नागरिकांना त्रास होतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडल्यावर कोणतेही निर्बंध न ठेवता आपल्या ताफ्यासोबत निघाले. त्यासाठी कोणत्याही व्हीव्हीआयपी रस्त्याचा वापर केला गेला नाही. यादरम्यान रहदारीत कुठलाही त्रास नागरिकांना झाला नाही.

एएनआय या न्यूज एजन्सीने पंतप्रधानांचा हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्या व्हीडिओतून हे दिसून येते की, रहदारी न थांबवता पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहने पुढे सरकत आहेत. रस्त्यावर लाल सिग्नल लागल्यानंतर मोदींची गाडीही थांबली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्या अशा सिग्नलला कधी थांबत नाहीत. पण नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील गाड्या लाल सिग्नल लागल्यावर थांबल्याचे व्हीडिओत दिसते. शिवाय, अशा ताफ्यासाठी रस्ते रिकामे केले जातात. लोकांना तिथून हटविले जाते. पण मोदींचा ताफा जात असताना असे काहीही घडले नाही. त्यामुळे मोदींच्या या ताफ्याचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक झाले.

सोशल मीडियावर लोकांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. त्यांच्या या कृतीमुळे मोदींनी व्हीव्हीआयपी कल्चर संपविले आहे. मोदी हे आपला दौऱ्यामुळे लोकांना त्रास होणार नाही, असे लोकांना वाटत आहे.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकादरम्यान रुग्णवाहिकांना मोदीच्या ताफ्याने वाट मोकळी करून दिली होती. त्याचेही जनमानसाकडून कौतुक झाले होते.

 

हे ही वाचा:

२०३० पर्यंत चीनकडे हजार अण्वस्त्र

महाराष्ट्रात कधी होणार पेट्रोल डिझेलच्या दरात घट?

केदारनाथचा ‘हा’ प्रश्न मार्गी लागला

दिवाळी हा अमेरिकेतही ‘राष्ट्रीय उत्सव’

 

दिल्लीतील आपल्या निवासस्थानातून निघाल्यानंतर मोदी हे जम्मू काश्मीरला गेले होते. तिथे त्यांनी नौशेरात जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवान हेच आपला परिवार असल्याचे ते तिथे म्हणाले होते.

Exit mobile version