१४ ऑगस्ट ‘फाळणी विभीषीका स्मृती दिना’निमित्त देशाच्या फाळणीच्या वेळी ज्यांनी बलिदान दिले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आज श्रद्धांजली वाहिली.
१४ ऑगस्ट रोजी भारताची फाळणी झाली. भारताच्या इतिहासातील हा दुर्दैवी दिवस असून भारताच्या संघर्षाचा आणि त्यागाचा दिवस आहे.त्यामुळे विभाजन विभिषिका स्मृती दिन भाजपकडून साजरा करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे की, ‘फाळणी विभीषीका स्मृती’दिन म्हणजे त्या भारतीयांचे स्मरण करण्याची संधी आहे ज्यांनी देशाच्या फाळणीसाठी प्राणांची आहुती दिली.या सोबतच हा दिवस आपल्याला विस्थापनाचा फटका सहन करण्याऱ्यांच्या दुःखाची आणि संघर्षाची आठवण करून देतो, अशा सर्व लोकांना मी नमन करतो.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीत फुटीचे कारण म्हणजे ईडीची कारवाई, शरद पवार !
एसी लोकलमध्ये ११ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक
“तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?”
माझ्या पुतण्याला भेटायला काय हरकत आहे?
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर देशाची फाळणी हा इतिहासातील एक काळा अध्याय आहे. त्यातून निर्माण झालेल्या द्वेषाने लाखो लोक मारले आणि करोडो लोक विस्थापित झाले.देशाला याची मोठी किंमत चुकवावी लागली आणि आजही अनेक लोक या धोक्याचा सामना करत आहेत. आज फाळणी विभीषीका स्मृती दिनानिमित्त मी त्या सर्व लोकांना नमन करतो, ज्यांनी फाळणीमुळे आपली आणि आपल्या परिवाराच्या सदस्यांनी प्राण गमावले.