भारताने दूरसंचार आणि डिजिटल भविष्य, ग्लोबल सेमीकंडक्टर इकोसिस्टम, ग्लोबल फिन्टेक फेस्टिव्हल आणि नागरी विमान वाहतूक आणि अक्षय उर्जेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्येही भाग घेतला. हे कार्यक्रम भारतावरील जगाचा विश्वास दर्शवतात. २०४७ पर्यंत विकसनशील भारताला विकसित बनवण्याचे लक्ष्य बनवायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, एआयचे हे युगे आहे. जगाचे वर्तमान आणि भविष्य एआयशी जोडलेले आहे. पण भारताकडे दुहेरी एआयची ताकद आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, मोदींकडे दोन एआय कसे आले. जगाकडे एकच एआय आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण आपल्याकडे अजून एक एआय आहे, ते म्हणजे ‘महत्वाकांक्षी भारत’ (aspirational india).