महाराष्ट्रात ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि गोव्या दौऱ्यावर

महाराष्ट्रात ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी हे नागपुरात वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. महाराष्ट्रात पंतप्रधान ७५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

गुजरात निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे या लोकार्पण कार्यक्रमाला विशेष महत्व आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सर्व व्यवस्थेमध्ये जातीने लक्ष घालत आहेत.

या दौऱ्यात पंतप्रधान ५२० किलोमीटर अंतराच्या आणि महाराष्ट्रातील नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही करणार आहेत. समृद्धी महामार्ग ४९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. हा मार्ग ११ जिल्ह्यांतील सुमारे ४०० गावांमधून जाणार आहे.

गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. हा विमानतळ सुमारे २ हजार ८७० कोटी खर्च करून विकसित करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी या विमानतळाची पायाभरणी केली होती.

यानंतर ते सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. पुढे मोदी नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि नागपुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे उद्घाटनही करणार आहेत.

हे ही वाचा :

‘लव्ह जिहाद’ कायद्याची पडताळणी सुरु, फडणवीसांची माहिती

‘या’ शहरात आहे सोन्याची नाणी देणारे एटीएम

भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार

मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण

विदर्भात पंतप्रधान १ हजार ५०० कोटी रुपयांच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ आणि नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी करतील. शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या एम्सचे राष्ट्राला समर्पित करतील., असे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version