पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा नुकताच समारोप झाला. यामध्ये भारताला एका रौप्यपदकासह पाच कांस्य पदके जिंकता आली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंची भेट घेणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास पंतप्रधान मोदी भारतीय संघाशी भेट घेणार असल्याची माहिती आहे. भारतीय ऑलिम्पिक संघातील प्रत्येक खेळाडूला स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण ११७ खेळाडू सहभागी झाले होते. या सर्वांना स्वातंत्र्यदिनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी या खेळाडूंशी भेट घेणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जेवहा एखाद्या खेळाडूने पदक जिंकले तेव्हा-तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा:
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लोगोत शिवरायांची प्रतिमा !
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
विदर्भ- मराठवाड्यात घडणार नवी दुधक्रांती
दरम्यान, पॅरिस ऑलम्पिक २०२४ स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पार पडली. भारताकडून ११७ खेळाडू विविध स्पर्धांसाठी सहभागी झाले होते. यावेळी भारताला एकूण सहा पदके मिळाली, ज्यामध्ये एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. भालाफेकमध्ये एक (रौप्य), नेमबाजीमध्ये तीन (कांस्य ), कुस्तीमध्ये एक (कांस्य) आणि हॉकीमध्ये एक (कांस्य) , असे एकूण सहा पदके भारताला मिळाली आहेत.