विजयी भव! पंतप्रधान साधणार भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद

विजयी भव! पंतप्रधान साधणार भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद साधणार आहेत. मंगळवार, १३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता मोदी या खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. टोकियो येथे होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचा चमू लवकरच रवाना होणार आहे. त्याच्या आधी पंतप्रधान मोदी या खेळाडूंशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा देणार आहेत.

२३ जुलैपासून टोकियो येथे होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातील खेळाडूंचा चमू रवाना होणार आहे. भारताचे एकूण १२६ क्रीडापटू हे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरले आहेत. तर १८ क्रीडा प्रकारांमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या १८ क्रीडा प्रकारांमध्ये एकूण ६९ वेगवेगळ्या स्पर्धा रंगणार आहेत.

हे ही वाचा:

महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश

पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा कालवश

फकिराच्या वेशात दागिने लुबाडणाऱ्याला पकडले

एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली

या साऱ्या चमूला शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता वर्चुअल पद्धतीने हा संवाद साधला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. “या प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. मला खात्री आहे की ते जे काही शेअर करतील त्यात तुम्हाला सर्वांनाच रस असेल.” असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या आधीही पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऑलिम्पिक साठीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. तर त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांनी काही क्रीडापटूंचा प्रेरणादायी कथा ही देशातील नागरिकांसोबत शेअर केल्या होत्या.

Exit mobile version