पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उदघाटन करणार आहेत. शुक्रवार २७ मे रोजी या महोत्सवाला दिल्ली येथे सुरुवात होईल. तर २७ मे आणि २८ मे असे दोन दिवस हा महोत्सव चालेल. दिल्ली येथील प्रगती मैदानात हा महोत्सव पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधान किसान ड्रोन वैमानिकांशी संवाद साधतील, ओपन एअर ड्रोन प्रात्यक्षिकांचे साक्षीदार होतील आणि ड्रोन प्रदर्शन केंद्रातील स्टार्टअप्सशी संवाद साधतील.
हे ही वाचा:
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान
अमेरिकेच्या कानशिलावर ‘बंदूक’!
यशवंत जाधवांना ईडी पुन्हा समन्स पाठवणार?
मोदी सरकारच्या काळात डिजिटल पेमेंटमध्ये भारत नंबर वन
भारत ड्रोन महोत्सव २०२२ हा दोन दिवसांचा कार्यक्रम असून तो २७ आणि २८ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सरकारी अधिकारी, विदेशी राजनैतिक अधिकारी , सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सार्वजनिक उपक्रम, खाजगी कंपन्या आणि ड्रोन स्टार्टअप इत्यादी यांच्यासह १६०० हून अधिक प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात ७० हून अधिक प्रदर्शक ड्रोनच्या वापराची विविध प्रात्यक्षिके प्रदर्शित करतील. या महोत्सवात ड्रोन वैमानिक प्रमाणपत्रे वितरणाचा आभासी समारंभ, उत्पादनांची सुरुवात, गट चर्चासत्र, हवाई प्रात्यक्षिके, मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सी प्रोटोटाइपचे प्रदर्शन, यासह इतर गोष्टींचा यात समावेश आहे.