कोरोना परिस्थितीच्या आढाव्यासाठी मोदींची उच्चस्तरीय बैठक

कोरोना परिस्थितीच्या आढाव्यासाठी मोदींची उच्चस्तरीय बैठक

देशातील वाढत्या कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीं एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. त्यांनी ही माहिती ट्वीट करून दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्वीट मध्ये त्यांनी

उद्या कोविड-१९च्या समस्येवर एका उच्चस्तरिय बैठकीच्या अध्यक्षपदी आहे. त्यामुळे मी उद्या पश्चिम बंगालला जाणार नाही असे सांगितले आहे.

हे ही वाचा:

वेदांत समुहाकडून प्राणवायूसाठी दक्षिणेतील काही भागांत मदत

नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला दररोज प्राणवायूचा पुरवठा

नागपूरात कोविड रुग्ण फरार

मोदी सरकारवर टीका ही तर मजबूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वीच बंगालमधील सभांमध्ये जास्ती जास्त ५०० लोकांनाच येऊ देण्याचे धोरण स्वीकारले होते. आता भारतातील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर व्हायला लागल्यानंतर मोदींनी या संपूर्ण प्रकारासाठी दिल्लीत उच्च स्तरिय बैठक बोलावली आहे.

भारतातील अनेक राज्ये सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांत देखील मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होताना दिसत आहे.

त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडूनही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण मोहिम अधिकाधीक वेगाने करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. इतके दिवस भारतीय लसीकरण मोहिम केवळ कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोनच लसींवर अवलंबून होती. मात्र आता त्यात स्पुतनिक-५ आणि फायझर या आणखी दोन लसींची भर पडली आहे. पुढच्या महिन्यापासून या दोन्ही लसी उपलब्ध होण्यची आशा व्यक्त केली जात आहे. त्याबरोबरच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांचे सरसकट लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.

Exit mobile version