पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अयोध्या विकास प्रकल्पाचा आढावा घेतला. एक अध्यात्मिक केंद्र, एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ तसेच एक महत्वाची स्मार्ट सिटी म्हणून प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या शहराचा विकास केला जात आहे. या साऱ्या कामाचा पंतप्रधानांनी आढावा घेतला आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर होऊ घातलेल्या भव्य राम मंदिरामुळे शहराच्या विकासाला अधिक वेग आला आहे. या मंदिरामुळे अयोध्येत एक भव्य अध्यात्मिक केंद्र उभे राहात असून ते एक जागतिक पर्यटन स्थळही ठरणार आहे. या दृष्टीने भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार अयोध्येच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेले दिसत आहेत.
पंतप्रधानांनी घेतलेल्या अयोध्या विकासाच्या घेतलेल्या आढाव्यात अयोध्येला जाण्यासाठीचे सर्व वाहतुकीचे मार्ग सुलभ सुकर व्हावेत असे मत व्यक्त गेले तर या दृष्टीने प्रस्तावित भविष्यातील प्रकल्पांची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. विमानतळ बांधणी, रेल्वेस्थानकाचा विस्तार, बस स्थानक, रस्ते आणि महामार्ग या सर्वच पायाभूत सुविधांच्या विषयी यावेळी चर्चा केली गेली.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री महाराष्ट्राला ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहातायत!
देवेंद्र फडणवीस नागपूर पोलिसांच्या ताब्यात
अनिल देशमुख यांनी ईडीकडे मागितला वेळ
ओबीसींचे राजकीय आरक्षण जाणे हे षडयंत्र
अयोध्येत एक ग्रीनफिल्ड नगर विकसित केले जात आहे. या ठिकाणी भक्तांसाठी निवासाची व्यवस्था तसेच आश्रम, मठ यांच्यासाठी जागा असणार आहे. तर पर्यटकांसाठी हॉटेल्स असणार आहेत. इथे विविध राज्यांची भवनेही उभारली जाणार आहेत. एक पर्यटन सुविधा केंद्र आणि जागतिक दर्जाचे वस्तूसंग्रहालय देखील उभारले जाणार आहे.
शरयू नदी आणि तिच्या घाटांच्या परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासालाही प्राधान्य दिले जात आहे. तसेच शरयू नदीवर क्रुझची देखील व्यवस्था केली जाणार आहे. तर त्याशिवाय, सायकलस्वार आणि पायी चालणाऱ्या लोकांसाठी देखील रस्त्यांवर पुसेशी मोकळी जागा ठेवण्याचे नियोजन या अयोध्येच्या विकास आराखड्यात करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी पायाभूत तंत्रज्ञानाचा वापर करून, शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजनही केले जाणार आहे.