स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात देश विकसित भारताच्या महान संकल्पाने पुढे जात आहे. भारताची सामूहिक शक्ती हाच विकसित भारत घडवण्याचा मार्ग आहे आणि राष्ट्राच्या विकासासाठी राज्याचा विकास हाच भारत घडवण्याचा मंत्र आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नागपूरमध्ये विविध विकासकामांचे उदघाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधान बोलत होते.
स्वातंत्र्याच्या अमृतात, विकसित भारताच्या महान संकल्पाने देश पुढे जात आहे. विकसित भारत घडवण्याचा मार्ग ही भारताची सामूहिक ताकद आहे. राष्ट्राच्या विकासासाठी राज्याचा विकास हाच विकसित भारत घडवण्याचा मंत्र आहे. गेल्या ८ वर्षांत आमची विचारसरणी आणि दृष्टीकोन दोन्ही बदलले आहेत. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास, सर्वांचा विकास आणि सर्वांचे प्रयत्न यावर आम्ही भर देत आहोत. मी जेव्हा ‘प्रत्येकाचा प्रयत्न’ म्हणतो तेव्हा त्यात प्रत्येक देशवासीय आणि राज्याचा समावेश होतो. लहान मोठे सर्वांची क्षमता वाढेल, मग भारत विकसित होईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पहिल्या औद्योगिक क्रांतीचा फायदा आपण घेऊ शकलो नाही. दुसऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे पडलो, पण आज जेव्हा चौथ्या औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे, ती गमावणे भारताला परवडणारे नाही याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लक्ष वेधले.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण
‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’
‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले
एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण
पंतप्रधान पुढे म्हणाले की, आधीच्या सरकारच्या काळात आपल्या देशातील प्रामाणिक करदात्यांनी जो कर भरला तो एक तर भ्रष्टाचाराचा बळी ठरला नाही तर व्होट बँक भक्कम करण्यात खर्च झाला. सरकारी तिजोरीतील एक एक रुपयांचा उपयोग देशातील युवापिढीच्या उज्वल भवितव्यासाठी खर्च केला जाणे ही काळाची गरज आहे.