रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आज आपला ९० वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंतप्रधान मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ”आज भारतीय रिझर्व्ह बँकेने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आरबीआयला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. आरबीआय ही एक संस्था म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाची साक्षीदार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आरबीआय तिच्या व्यावसायिकतेमुळे आणि बांधिलकीमुळे जगभरात ओळखली जाते. आरबीआयच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.सध्या जे आरबीआयशी संबंधित आहेत त्यांना मी खूप भाग्यवान समजतो. आज तुम्ही बनवलेली धोरणे आणि तुम्ही करत असलेले काम आरबीआयच्या पुढील दशकाची दिशा ठरवेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!
छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!
सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप
दिल्लीत इंडिया आघाडीसोबत आणि बंगालमध्ये ममता म्हणतात, काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत
हे दशक या संस्थेला शताब्दी वर्षापर्यंत घेऊन जाणारे दशक आहे आणि हे दशक विकसित भारताच्या संकल्प प्रवासासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. येणारे दशक ही संस्था शताब्दी वर्षात घेऊन जाणार आहे. आरबीआयच्या उद्दिष्टांसाठी आणि संकल्पांसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या ‘८० व्या’ वर्षाच्या कार्यक्रमात आलो तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. भारतातील संपूर्ण बँकिंग क्षेत्र समस्या आणि आव्हानांना तोंड देत होते.एनपीएबाबत भारताच्या बँकिंग व्यवस्थेची स्थिरता आणि भवितव्य याबद्दल प्रत्येकाच्या मनात भीती होती. आणि आज पहा, भारताची बँकिंग प्रणाली जगात एक मजबूत आणि टिकाऊ प्रणाली म्हणून गणली जात आहे. एकेकाळी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेली बँकिंग व्यवस्था आता फायदेशीर बनली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.गेल्या १० वर्षांत जे काही घडले ते केवळ ट्रेलर आहे. अजून खूप काही करायचे आहे, अजून देशाला पुढे न्यायचे आहे, पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.