23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष‘ईडीच्या कार्यक्षमतेत २०१४नंतर सुधारणा’

‘ईडीच्या कार्यक्षमतेत २०१४नंतर सुधारणा’

पंतप्रधान मोदी यांनी सादर केली आधी आणि नंतरची आकडेवारी

Google News Follow

Related

सन २०१४नंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाल्याचे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरावा म्हणून आकडेवारी सादर केली. ईडीने २०१४पूर्वी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) १८००पेक्षा कमी खटले दाखल केले होते. एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर ही संख्या पाच हजारांहून अधिक झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हा त्यांच्या सुधारित कार्यक्षमतेचा पुरावा आहे, असे पंतप्रधानांनी एशियानेट न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात असल्याच्या या पक्षांनी केलेल्या आरोपांनाही पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. ‘ईडीने नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपैकी केवळ तीन टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित व्यक्तींविरुद्ध आहेत,’ असा दावा मोदी यांनी केला.विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ‘भ्रष्टाचारावर कारवाई करण्यासाठी एखादी संस्था स्थापन केली असेल, ती संस्था काम करत नसेल तर याबाबत प्रश्न उपस्थित केले पाहिजेत.

हे ही वाचा:

मुंबईतल्या भाजप कार्यालयाला आग!

‘जे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाते’

जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा शत्रू, ९ वर्षांनंतर छोटा राजनचे फोटो आले समोर!

शतक झळकावल्यानंतर ट्रॅव्हिस हेडचे ‘नो सेलिब्रेशन’

ही संस्था तिचे काम करत असल्याने, तिच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात अर्थ नाही,’ असे ते म्हणाले.
सरकारने तपास यंत्रणांना स्वतंत्रपणे काम करू द्यावे आणि त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या कामात अडथळा आणू नये, असेही पंतप्रधान म्हणाले.सन २०२४च्या लोकसभा निवडणुका या अधिक गांभीर्याने घ्यावयाच्या आहेत. कारण देशातील मतदारांनी ‘तीन दशकांच्या अस्थिर सरकारांनंतर स्थिर सरकार काय करू शकते, याचा अनुभव घेतल्याचे मोदी म्हणाले. अशा ‘अस्थिर सरकारांनी’ देशाचे खूप नुकसान केले आहे आणि सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुका महत्त्वाच्या आहेत कारण लोक त्यांच्या अनुभवाच्या आधारे मतदान करतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘माझा विश्वास आहे की २०२४ची निवडणूक भाजप किंवा मोदी लढत नाहीत. हा लोकांचा पुढाकार आहे,’ पंतप्रधान म्हणाले. सन २०१४मध्ये पंतप्रधान झाल्याबद्दलही ते म्हणाले, ‘लोकांना माझ्याकडून आशा होत्या आणि मला देशातील लोकांच्या आशा पूर्ण करण्याच्या आशा होत्या. मी राज्य करत नाही, मी सेवा करतो. सरकार चालवण्यासाठी, सरकार चालवताना मी पदाचा उपभोग घेत नाही,’ असेही मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी मागील सरकारांवर टीकास्त्र सोडले. ‘त्यांनी पश्चिम आशियाशी भारताचे संबंध मजबूत करण्याच्या दिशेने काम केले नाही. भारत आणि या देशांमधील संबंध विक्रेता व खरेदीदार या रूपातून अधिक व्यापक विकासाकडे वळले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा