25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषपंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार राष्ट्रपतींचे अभिभाषण

Google News Follow

Related

संसदेत बुधवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेट अधिवेशनाच्या प्रारंभी आपल्या भावना व्यक्त करताना देश प्रथम आणि देशवासी प्रथम हे उद्दीष्ट समोर ठेवून आम्ही काम करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या काळात डळमळीत झाली होती, अशा परिस्थिती नव्या वर्षातील भारताचा अर्थसंकल्प कसा असेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे. त्यामुळे भारताकडे सगळे जग आशेने पाहात आहे.

नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,  भारताच्या राष्ट्रपतींची पहिले अभिभाषण मंगळवारी होत आहे. राष्ट्रपतींचे भाषण भारताच्या संविधानाचा गौरव आहे. भारताच्या संसद प्रणालीचा गौरव आहे. आणि विशेष रूपाने आज नारीसन्मानचा मोका आहे. सुदूर जंगलात जीवन व्यतित करणाऱ्या देशातील महान आदिवासी परंपरेचाही सन्मान आहे. संसदेलाच नाही तर देशाच्या सन्मानाचा क्षण आहे. राष्ट्रपतींचे हे पहिले भाषण आहे. संसदीय कार्यात गेल्या काही काळात जी परंपरा तयार झाली आहे. नवा खासदार बोलण्यासाठी उभा राहिला की तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याचे स्वागत संपूर्ण संसद करते. त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे वातावरण तयार करते. ही उज्ज्वल परंपरा आहे. राष्ट्रपतींचे भाषणही त्यांचे पहिलेच अभिभाषण आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या चित्ररथाने पटकावला द्वितीय क्रमांक

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

२०२४ ला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान!

अदानी उद्योगसमुहाच्या ४१३ पानी प्रत्युत्तरात काय म्हटले आहे?

मोदी म्हणाले की, भारताच्या अर्थमंत्रीही महिला आहेत. त्या उद्या बजेट घेऊन येत आहेत. वैश्विक परिस्थितीत भारताच्या बजेटकडे भारताचेच नव्हे तर विश्वाचे लक्ष आहे. डळमळीत आर्थिक परिस्थितीत जगात भारताचे बजेट आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेलच पण विश्व आशेने भारताकडे बघत आहे. ते आशेचे किरण अधिक प्रकाशमान दिसतील असे प्रयत्न होतील. मला विश्वास आहे की निर्मलाजी यात यशस्वी होतील.

मोदींनी सांगितले की, भाजपा नेतृत्वात एनडीए सरकारचा एकच उद्देश आहे, एकच लक्ष्य आहे, एकच विचार आहे इंडिया फर्स्ट सिटिझन फर्स्ट. देश प्रथम आणि देशवासी प्रथम. या भावनेला पुढे नेऊ. बजेट सत्रात टीकाही होईल पण चर्चाही व्हायला हवी. मला विश्वास आहे, विरोधी पक्ष तयारी करून आले असतील. बारकाईने अभ्यास करून आपले म्हणणे मांडतील. संसद सभागृह देशाची धोरणांसाठी मंथन होईल आणि त्यातून अमृत बाहेर पडेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा