पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोविड परिस्थिती आणि लसीकरणाच्या बाबतीत केलेली भारताने प्रगती याचा आढावा घेतला. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना देशातल्या लसीकरणाबाबतचे विस्तृत सादरीकरण देण्यात आले. यात प्रत्येक वयोगटातील लसीकरणाची आकडेवारी देण्यात आली. तर आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांच्या लसीकरणाचाही आढावा पंतप्रधानांनी घेतला.
यासोबतच पंतप्रधानांना आगामी काळात भारतात येऊ घातलेला लसींचा साठा आणि लसींची निर्मिती वाढविण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्न याबद्दल माहिती देण्यात आली. तर गेल्या सहा दिवसात म्हणजेच २१ जून पासून देशात झालेल्या लसीकरणाची आकडेवारी पंतप्रधान मोदी यांना सांगण्यात आली.
हे ही वाचा:
भारत-चीनचे रणगाडे काहीशे फुटांवर आमनेसामने
मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल
गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!
शेती कायद्याविरोधातील आंदोलकांचा धुडगूस
काही दिवसांपूर्वी भारत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेत लसीकरणाची सारी सूत्रे आपल्या हातात घेतली. २१ जून पासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत भारताने एकूण ३.७७ कोटी लसी दिल्या आहेत. हा आकडा लक्षात घेता भारताने गेल्या सहा दिवसात मलेशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा यांसारख्या देशांच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा अधिक लसीकरण केले आहे.
देशातल्या १२८ जिल्ह्यांमध्ये ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर १६ जिल्ह्यांमध्ये २५ पेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे