पंतप्रधान मोदींनी घेतला भारताच्या ऑलिम्पिक तयारीचा आढावा

पंतप्रधान मोदींनी घेतला भारताच्या ऑलिम्पिक तयारीचा आढावा

जागतिक दर्जाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला अवघे पन्नास दिवस शिल्लक असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेसाठीच्या भारताच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनी टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारतीय स्पर्धक आणि भारत सरकारचे क्रीडा मंत्रालय कशाप्रकारे कार्यरत आहे या विषयीचे एक प्रेझेन्टेशन पंतप्रधानांना दिले. यावेळी खेळाडूंचे प्रशिक्षण, त्यांचे लसीकरण,कोविडच्या दृष्टीने घेतली जाणारी इतर खबरदारी या सार्‍या गोष्टींचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी जातीने लक्ष घालून घेतला आहे.

जगभर पसरलेल्या कोविड महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. क्रीडाक्षेत्रही याला अपवाद नसून कोविडच्या सावटामुळे अनेक क्रीडा स्पर्धा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली जागतिक दर्जाची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा येत्या जुलै महिन्यात टोकीयो, जपान येथे होऊ घातली आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी भारतातून एकूण शंभर खेळाडू पात्र ठरले असून लवकरच ते या स्पर्धेत भाग घेण्यासाठी टोकीयो येथे रवाना होणार आहेत.

हे ही वाचा:

सीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुतनिक व्ही चे उत्पादन?

शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही

राज्य सरकार बारावीची परीक्षा घेण्यास अनुत्सुक

पुलवाम्यात भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या

या सर्व पार्श्‍वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी भारताची कशा प्रकारची तयारी झाली याचा आढावा गुरुवार 3 जून रोजी एका व्हर्चुअल बैठकीद्वारे घेतला. तर जुलै महिन्यात स्पर्धा सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी हे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत आणि समस्त भारतीयांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देणार आहेत.

खेळ हे आपल्या देशाच्या हृदयात आहेत. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या युवा खेळाडूंसोबत १३५ कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूमुळे इतर हजारो तरुण हे क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होत असतात असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Exit mobile version