पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली लतादिदींची आठवण, रांगोळी, अंगाई गीत कलेची घेतली दखल

मन की बातमध्ये या कलांचे प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांचा केला गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली लतादिदींची आठवण, रांगोळी, अंगाई गीत कलेची घेतली दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बातमधून नियमितपणे विविध कलागुणांची दखल घेत असतात. यावेळी देशभक्तीपर गीत, अंगाई गीत आणि रांगोळी कलेतील गुणवंतांच्या कलेची दखल त्यांनी घेतली. हा मन की बातचा ९८वा भाग होता. त्यात या तिन्ही प्रकारांच्या स्पर्धांतील विजेत्यांबद्दल पंतप्रधान बोलले.

ते म्हणाले की, कित्येक लोकांच्या मनकी बात माझ्यापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचते. समाज शक्तीने कशी देशाची शक्ती वाढते मन की बातच्या अनेक भागातून हे शिकलो आहोत. मला आठवते की मन की बातमधून पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिले. त्यातून त्या खेळांची चर्चा सुरू झाली. भारतीय खेळण्यांची चर्चा झाली. त्यालाही भरपूर प्रोत्साहन मिळाले. आता या खेळण्यांची क्रेझ वाढली आहे. विदेशातही मागणी वाढली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीदिनी एकता दिवसाच्या निमित्ताने ३ स्पर्धा घेतल्या होत्या. देशभक्तीपर गीत, अंगाई गीत व रांगोळी. त्याला भरघोस प्रतिसाद लाभला. देशभरातून ७००पेक्षा अधिक जिल्हे याच्याशी जोडले गेले. ५ लाख लोकांनी यात भाग घेतला. सर्व वयोगटातील लोक यात सहभागी झाले होते. २० पेक्षा अधिक भाषांमधील लोकांनी प्रवेशिका पाठविल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त भारतरत्न लता मंगेशकर यांची आठवण काढली. ते म्हणाले की, मला यानिमित्ताने लतादीदींची आठवण येते. ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा लतादीदींनी ट्विट करत देशवासियांना आग्रह केला व स्पर्धेत भाग घेण्याची विनंती केली.

हे ही वाचा:

सीमेंट, फायबर विटांखालून आणली जात होती दारू

पुढल्या वर्षांपासून मेट्रो नऊ  सुरु होणार  

कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक मतदानास सुरवात

ठाकरे, नवाझुद्दीनच्या भेटीचे ‘राज’ ?

अंगाई गीत स्पर्धेतील पहिला पुरस्कार बीएम मंजुनाथ यांना मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकच्या चामरू जिल्ह्यातील मंजुनाथ यांनी कन्नडमध्ये लिहिलेल्या मलगु कंदासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ते गीतही ऐकविण्यात आले. याची प्रेरणा आई व आजीकडून मंजुनाथ यांना मिळाल्याचे ते म्हणाले. याच स्पर्धेत आसाममधये कामरुपमधील दिनेश गोवाडा यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे, हेदेखील पंतप्रधानांनी सांगितले.

रांगोळीत महाराष्ट्राच्या सचिन अवसारेचे यश

रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांची दखल घेताना त्यांच्या कलेचे कौतुक पंतप्रधानांनी केले. ते म्हणाले की, पंजाबच्या कमलकुमारला विजेतेपद मिळाले. नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर भगतसिंग यांची त्याने काढलेली रांगोळी उत्कृष्ठ ठरली. महाराष्ट्राच्या सांगलीच्या सचिन नरेंद्र अवसारे याने जालियनवाला बागेतील नरसंहार, उधमसिंह यांचा बहादुरी दाखविली. गोवा गुरूदत्त वांटेकर यांनी गांधीजींची सुंदर रांगोळी काढली. देशभक्तीपर गीतामध्ये आंध्र प्रदेशच्या टी विजय दुर्गा यांनी तेलुगूत लिहिलेल्या व गायलेल्या गीताला विजेतेपद मिळाले. नरसिंहा रेड्डी गारू यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली. मैथिली भाषेत दीपक वत्स यांनाही पुरस्कार मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी काही वाद्य वाजविणाऱ्यांच्या कामाचीही दखल घेतली. सूरसिंगार हे वाद्य वाजविणारे आणि ही कला जोपासणारे जॉयदीप मुखर्जी यांचे वादन कार्यक्रमात ऐकविले. हे वाद्य दुर्मिळ झाले होते पण, जॉयदीपने सूरसिंगारला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले.

संग्राम सिंह सुहास भंडारी वारकरी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. राजकुमार नायक तेलंगणात १०१ दिवस चालणाऱ्या पेरिनी ओडिसीचे आयोजन केले होते. त्यांना पेरिनी नाट्यम करतात शिवाला समर्पित आहे. साईखोम सूरचंद्र मैतेयी पुंग हे वाद्य बनवतात. मणिपूरशी त्याचे नाते आहे. पूरण सिंह दिव्यांग आहेत. राजुला, मालुशाही, नेओली या संगीतप्रकारांना लोकप्रिय बनवत आहेत. त्याच्या रेकॉर्डिंगही केल्या आहेत, याचाही उल्लेख पंतप्रधानांनी मन की बातमध्ये केला.

Exit mobile version