पत्रकार निधी राजदान आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात.विशेष म्हणजे त्यांची प्रत्येक भूमिका ही भाजप विरोधी असते.परंतु यावेळी त्यांच्या तोंडून पंतप्रधान मोदींचे आणि भाजपचे कौतुक ऐकायला मिळाले आहे.बदलता भारत देश अन त्यापाठीमागे भाजपची, पंतप्रधान मोदींची मेहनत यावर निधी राजदान यांनी वक्तव्य केलं आहे.निधी राजदान या भाजपच्या टीकाकार म्हणून ओळखल्या जातात मात्र, पंतप्रधान मोदींच्या कौतुकावरून असे कळते त्यांना कदाचित आता भान आले असावे असे म्हटले जात आहे.
२०१४ साली पंतप्रधान मोदींनी सत्ता स्थापन केल्यानंतर पाठीमागे पडलेल्या भारताला पुढे नेण्यास सुरुवात केली.विविध योजना, बाहेरील देशांशी व्यापार, आयात-निर्यात, संरक्षण, अशा विविध समस्या समोर ठेवून पंतप्रधान मोदींनी काम केलं आणि भारताची एक वेगळी ओळख निर्माण झाली.आता संपूर्ण जगात भारताचे नाव घेतले जाते आणि हे सर्व पंतप्रधान मोदींमुळेच शक्य झाले आहे.भारतातील जनतेलाही या सर्व गोष्टी माहिती आहेत.त्यामुळे भाजप यंदाच्या लोकसभेला ४०० पारचा नारा देत आहे.
हे ही वाचा:
‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी जागीच निष्प्रभ’
रिकामं डोकं कुलगुरूंची अक्कल काढते तेव्हा..
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन नाहीच
पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये निदर्शने
Nidhi Razdan changes side!, says PM Modi has done welfare, good schemes, worked for every caste on the other hand INDI Alliance has no vision, no roadmap. They only abuse Modi Govt. pic.twitter.com/cDXf2KbSuc
— 💪🎭..Rai ji..💪🎭 (@Vinod_r108) May 10, 2024
मात्र, काही लोक असेही आहेत ज्यांना देशाचा विकास दिसत नाही.ही अशी लोकं फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदींना आणि भाजपला टार्गेट करत असतात.भाजपवर, पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांमध्ये पत्रकार निधी राजदान यांचेही नाव समोर येत असे. भाजपची टीकाकार म्हणूनही त्यांना ओळखलं जात.परंतु यावेळी त्यांनी भाजपचे पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.तसेच इंडी आघाडीवर निशाणा देखील साधला आहे.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निधी राजदान म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींकडे व्हिजन आहे तर दुसरीकडे इंडी आघाडीवाल्यांकडे कोणतेच व्हिजन नाहीये.भाजप आणि पंतप्रधान मोदींनी केवळ मंदिर बांधले म्हणून त्यांना यश मिळाले नाही, तर कल्याणकारी, चांगल्या योजना आणि प्रत्येक जातीसाठी काम पंतप्रधान मोदींनी काम केलं आहे.विरोधकांकडे कोणतेच व्हिजन नसल्याने ते फक्त मोदी सरकारला शिव्या देत आहेत.त्यामुळे नुसतं शिव्या देऊन मतदारांचे मन वळवू शकत नाहीत.त्यांचा जो काही रोडमॅप आहे तो आजून ते देऊ शकलेले नाहीत, असे निधी राजदान म्हणाल्या. निधी राजदान यांच्या वक्तव्यानंतर भाजप विरोधाची बाजू बदलल्याचे दिसत आहे.पंतप्रधान मोदींच्या बदलत्या भारताबरोबर निधी राजदान यांच्यात देखील बदल झालाय का, असा प्रश्न निर्माण होत आहे.