पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी रोजी गायक हरिहरन यांनी गायलेले श्री राम भजन ट्विटरवर शेअर केले.हरिहरन यांच्या भजनाची मोदींनी प्रशंसा केली आणि सर्वांना भक्तीगीतांचा आनंद घेण्याचे आवाहन केले.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी सर्वभाविक आतुर झाले आहेत.प्रभू राम अयोध्येत विराजमान होणार असल्याने देशभरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर श्री राम भजन शेअर करत गायक हरिहरन यांचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा:
यंदा कर्तव्यपथावर ‘शिवराज्याभिषेक’
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आता सुसाट; प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण
लक्षद्वीप मुद्द्यावरून इस्रायल भारताच्या पाठीशी; मोठ्या प्रकल्पाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टांगती तलवार
नुकतेच गुजरातच्या लोक गायिका गीता रबारी यांचे ‘श्री राम घर आये’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.याबाबत पंतप्रधान मोदींनी एक पोस्टही शेअर केली होती. पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिले होते की, अयोध्येतील भगवान रामाच्या भव्यदिव्य मंदिरात राम लल्लाच्या आगमनाची प्रतीक्षा संपणार आहे. देशभरातील माझे कुटुंबीय त्यांच्या प्राणप्रतिष्ठेची आतुरतेने वाट पाहत आहेत.यासोबत गायिका गीता रबारी यांचे कौतुक केले होते.त्यानंतर आता गायक हरिहरन यांनी गायलेल्या ‘सबने तुम्हे पुकारा श्री राम जी’ या भजनाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हरिहरन यांचे कौतुक
पंतप्रधान मोदींनी ९ जानेवारी रोजी ट्विटरवर श्री राम भजनाची पोस्ट शेअर केली. पंतप्रधान मोदी पोस्टमध्ये लिहिले की, हरिहरन यांनी गायलेले भजन किती सुंदर आहे याची त्यांनी प्रशंसा केली. त्यांनी हिंदीत लिहिले की, “हरिहरनजींच्या मधुर संगीताने सुशोभित केलेले हे राम भजन सर्वांना भगवान श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन करेल. तुम्हीही या सुंदर भजनाचा आस्वाद घ्यावा, असे मोदींनी ट्विट केलं आहे.