‘श्री राम घर आये’ गाण्याने पंतप्रधान मोदी प्रभावित!

लोक गायिका गीता रबारी म्हणाल्या, माझ्यासाठी अभिमानाचा क्षण

‘श्री राम घर आये’ गाण्याने पंतप्रधान मोदी प्रभावित!

गुजरातच्या लोक गायिका गीता रबारीचे ‘श्री राम घर आये’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत पंतप्रधान मोदींनी एक पोस्टही शेअर केली आहे. पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, अयोध्येतील भगवान रामाच्या भव्यदिव्य मंदिरात राम लल्लाच्या आगमनाची प्रतीक्षा संपणार आहे. देशभरातील माझे कुटुंबीय त्यांच्या प्राणप्रतिष्ठेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

माझ्यासाठी अभिमानाचा क्षण
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर त्यांच्या गाण्याचे कौतुक केल्यानंतर लोक गायिका गीता रबारी म्हणाल्या की, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘श्री राम घर आये’ हे गाणे शेअर केले आहे. त्यांनी भारतातील मुलींना नेहमीच आशीर्वाद दिले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकावर बोलताना लोक गायिका गीता रबारी म्हणाल्या की, मला २२ जानेवारीला अयोध्येला जाण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच जाईन. जर मला जाण्याची संधी मिळाली नाही, तर मी नंतर माझ्या संपूर्ण कुटुंबासह प्रभू रामांचे दर्शन घेईन.

हे ही वाचा:

अफगाणिस्तान सिरीजमधून पंड्या, सुर्यकुमार आऊट

बोरिवलीत शस्त्रसाठ्यासह सापडले ६ संशयित!

उत्तर प्रदेशातील २५० वर्षे जुन्या मशिदीमध्ये ‘अजान’ देणार्‍या व्यक्तीला अटक!

तृणमूल काँग्रेस नेते सत्यन चौधरी यांची भरदिवसा हत्या!

सुनीता जोशी (पंड्या) यांनी ‘श्री राम घर आये’ हे गाणे लिहिले असून या गाण्याला मौलिक मेहता यांनी संगीत दिले आहे. १ जानेवारी रोजी यूट्यूबवर पोस्ट केलेल्या या गाण्याला आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.पंतप्रधानांनी यापूर्वी भगवान रामावर आधारित अशीच भजने शेअर केली होती . स्वस्ती मेहुल, जुबिन नौटियाल, हंसराज रघुवंशी आणि स्वाती मिश्रा यांनी गायलेली भक्तिगीतेही पंतप्रधान मोदींनी शेअर केली आहेत.

Exit mobile version