युवकांसाठी तू प्रेरणास्थान आहेस!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रज्ञानंदचे केले कौतुक

युवकांसाठी तू प्रेरणास्थान आहेस!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व बुद्धिबळ स्पर्धेतील उपविजेता ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद याची खास भेट घेतली आणि त्याला शुभेच्छा दिल्या. नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली. त्याआधी, बुधवारी त्याचे चेन्नईत आगमन झाले. तेव्हा त्याचे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

नुकतीच प्रज्ञानंद आणि जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन यांची लढत झाली. त्यात प्रज्ञानंदला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र जगभरातून त्याच्या या कामगिरीचेही कौतुक झाले. विश्व बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोघांना पहिल्या दोन फेऱ्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यानंतर टायब्रेकरमध्ये मात्र कार्लसनने बाजी मारली होती.

 

पंतप्रधानांशी भेट झाल्यानंतर प्रज्ञानंदने सोशल मीडियावर या भेटीविषयी लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे ही सन्मानाची गोष्ट होती. पंतप्रधानांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्या आईवडिलांनाही शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा:

मोदींना रोखण्यासाठी ‘चार आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला’…

जोहान्सबर्गमधील इमारतीत अग्नितांडव; ६३ जणांचा मृत्यू

हिंडेनबर्ग अहवालाला पुन्हा हवा देण्यासाठी खोटे आरोप; अदानी समुहाचा दावा

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात

पंतप्रधानांनीही या भेटीची माहिती आपल्या X हँडलवर दिली. त्यात ते म्हणतात की, आज एका विशेष पाहुण्याची भेट झाली. प्रज्ञानंद तुला भेटून खूप आनंद झाला. तुझ्या कुटुंबियांनाही भेटता आले. तू आपली आवड जोपासली आहेस आणि त्यात सातत्य राखले आहेस. भारतीय युवक कशापद्धतीने जग जिंकू शकतात याचा आदर्श वस्तूपाठ तू घालून दिलास. तुझा अभिमान वाटतो.

बुद्धिबळ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानंद हा सर्वात लहान खेळाडू ठरला. त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी त्याचे रशियाचा जगज्जेता खेळाडू गॅरी कास्पारोव्हकडून कौतुकाची थाप मिळाली.

Exit mobile version