पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेतील खासदारांच्या निरोप प्रसंगी सभागृहाला संबोधित केले.राज्यसभेतील कार्यकाळ संपत असणाऱ्या सदस्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले.देशासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.जेव्हा-जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा त्यांची खूप आठवण येत राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मनमोहन सिंग यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले आहे. मनमोहन सिंग यांचे या सभागृहात विशेष योगदान आहे.ते पुढे म्हणाले की, खासदार कधीच निरोप घेत नाहीत. जेव्हा-जेव्हा लोकशाहीवर चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
समान नागरी कायदा विधेयक उत्तराखंड विधानसभेत मंजूर
‘श्रीकृष्णाने पाच गावे मागितली होती, आम्ही तीन मागतो’
अमेरिकेचा बगदादमध्ये ड्रोनहल्ला इराणसमर्थक दहशतवादी कमांडरसह तिघांचा मृत्यू
मिलिंद देवरांनंतर बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामाराम
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे ६ वेळा सभागृहाचे सदस्य होते, वैचारिक मतभेदही होते, पण त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.त्यांनी सभागृहाला अनेकदा मार्गदर्शन केले. खासदारांच्या योगदानाचा उल्लेख केला की मनमोहन सिंग यांची चर्चा नक्कीच होईल.जुनी आठवण काढत पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभेत मतदानाचा एक प्रसंग होता.या मतदानानंतर विजय हा सत्ताधाऱ्यांचाच होणार हे स्पष्ट होते.
परंतु, आपले कर्तव्य बजावण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले व त्यांनी मतदान केले.लोकशाहीला अधिक बळकट बनवण्यासाठी मनमोहन सिंग होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.आमची त्यांच्याकडे एक विशेष प्रार्थना आहे की, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावे.आम्हाला जेव्हा जिथे बसायला सांगितले तिथे आम्ही बसलो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.दरम्यान, राज्यसभेतील ५६ खासदारांचा कार्यकाळ आज संपणार असून हे खासदार निवृत्त होणार आहेत.