आज भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ९८ वी जयंती देशभरात सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ‘सदैव अटल’ येथे पोहोचून माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनीही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर मंत्री आणि नेत्यांनीही अटलबिहारी वाजपेयींचे यांनीही यावेळी सदैव अटल येथे श्रद्धांजली अर्पण केली. समाधीस्थळीच झालेल्या प्रार्थना सभेत भजन सम्राट अनूप जलोटा यांनी अटलजींची आवडती भजने गायली . अटलजीना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. भारतासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी लाखो लोकांना प्रेरणा देणारे आहे असे ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “भारतरत्न” अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आणि भारतासाठी त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगितले.
Delhi | President Droupadi Murmu, Vice-President Jagdeep Dhankhar and Prime Minister Narendra Modi pay floral tribute at ‘Sadaiv Atal’ on former PM Atal Bihari Vajpayee's birth anniversary. pic.twitter.com/sIpjzeUmNL
— ANI (@ANI) December 25, 2022
स्वातंत्र्यसैनिक पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारतमातेचे महान पुत्र महामानव पंडित मदन मोहन मालवीय जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.” देशाच्या शैक्षणिक जगताच्या समृद्धीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, ज्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन
५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत
मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अटल जयंतीनिमित्त विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा आणि राज्यसभेचे सभापती, भाजपच्या दोन्ही सभागृहांचे खासदार, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आणि भाजप नेत्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. भाजप देशभरातअटल जयंती मोठ्या दिमाखात साजरी करत असून, त्यामध्ये माजी पंतप्रधानांच्या कवितांवर आधारित काव्यांजली कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.