फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्यांचे पंतप्रधान मोदींनी केले स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी दरवर्षी स्मृतीदिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्यांचे पंतप्रधान मोदींनी केले स्मरण

आज, १४ ऑगस्ट रोजी भारत फाळणी स्मृतीदिन साजरा करत आहे. फाळणी दरम्यान ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे. इतिहासाच्या त्या दुःखद काळात बळी पडलेल्यांच्या सहनशीलतेचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी दरवर्षी स्मृतीदिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, “आज फाळणी स्मृतीदिनी, मी फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या इतिहासाच्या त्या दुःखद काळातील पीडितांच्या संयम आणि सहनशीलतेची प्रशंसा करतो.” असे ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात १४ ऑगस्ट फाळणी दिन हा “विभाजन विभीषिका स्मृति दिवस” म्हणून पाळला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जाणार आहे.

हे ही वाचा:

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

१९४७ च्या फाळणीच्या वेळी लाखो लोक विस्थापित झाले आणि जातीय दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले. देशाच्या इतिहासात १४ ऑगस्ट या तारखेचे खूप महत्व आहे. याच दिवशी देशाची फाळणी झाली आणि १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आले.

Exit mobile version