26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषवसाहतवादी राजवटीविरुद्धच्या प्रतिकारासाठी नेताजी नेहमीच स्मरणात राहतील

वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या प्रतिकारासाठी नेताजी नेहमीच स्मरणात राहतील

wrote-trying-to-make-his-vision-come-true

Google News Follow

Related

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना नमन केले आहे . पंतप्रधानांनी ट्विट शेअर केले आहे. वसाहतवादी राजवटीविरुद्ध त्यांनी केलेल्या तीव्र प्रतिकारासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. मोदी सरकारने २०२१ मध्ये आझाद हिंद फौजेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला ‘शौर्य दिन’ असे नाव दिले आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी वाजता संसद भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली अर्पण करतील.

आज पराक्रम दिनानिमित्त मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहतो आणि भारताच्या इतिहासातील त्यांच्या अद्वितीय योगदानाचे स्मरण करतो. वसाहतवादी राजवटीविरुद्ध त्यांनी केलेल्या प्रखर प्रतिकारासाठी त्यांचे स्मरण केले जाईल. भारतासाठीची त्यांची दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींचे स्मरण करताना ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

आज शौर्य दिवसानिमित्त पंतप्रधान अंदमान-निकोबारच्या २१ बेट समूहांची नावे देणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांचे नाव देतील. यासोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर बांधण्यात येणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही पंतप्रधान मोदी अनावरण करतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा