‘मीडियातले पत्रकार स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार करत आहेत!’

पत्रकार परिषद का घेत नाहीत, यावरून मोदींनी दिले उत्तर

‘मीडियातले पत्रकार स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार करत आहेत!’

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. सर्वात लोकप्रिय नेते आणि स्टार प्रचारक म्हणून त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी आहे. पंतप्रधान मोदी पक्ष कार्यकर्ते, उमेदवार आणि नेत्यांना निराश करत नाहीत. ते दिवसाला अनेक रॅलींना संबोधित करत आहेत.पंतप्रधान मोदी एवढे व्यस्त असूनही वेळात-वेळ काढून ते मीडियाला भेट देतात.मात्र, अनेक दिवसांपासून लोकांच्या मनात एक प्रश्न वारंवार येतो तो म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एकही पत्रकार परिषद का घेतली नाही.या प्रश्नाचे उत्तर खुद्द पंतप्रधान मोदींनी दिले आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले, मिडिया आता बदलला आहे, पहिला सारखा राहिलेला नाही.तो आता पूर्वीसारखा तटस्थ राहिला नाही पत्रकार आता स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तकला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले की, तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता तेव्हा पत्रकार परिषद, मुलाखत देत होतात.मात्र, तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर हे सर्व कमी झाले आहे.पत्रकार परिषद तर तुम्ही घेत नाहीच आणि मुलाखतीची संधीही कमीच मिळते.जर पंतप्रधान मोदी सर्व प्रश्नांना उत्तर देऊ शकतात तर पत्रकार परिषद का घेत नाहीत?, असा सवाल अनेक जणांच्या मनात आहे, असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला.

हे ही वाचा:

कोकण रेल्वे आता बोरिवलीवरून सुटणार

“उद्धव ठाकरे जे पांचट जोक, टोमणे मारतात, ते शोभणारे नाही!”

एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर नेपाळकडून बंदी

‘मोदींचे हात बळकट करा… तेच तुम्हाला या वादळातून सुखरूप तारतील’

या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुलाखतीसाठी मी कोणालाही नाही म्हटले नाही.दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे मीडियाचा जास्त वापर असा झाला आहे की, माध्यमांना आपल्या हातात ठेवा आणि काहीतरी सांगा म्हणजे देशात चालून जाईल.मला त्या रस्त्यावर जायचे नाही, मला मेहनत करायची आहे.मला गरीबाच्या घरी जायचे आहे.मला जर वाटले तर मी विज्ञान भवनमध्ये जाऊन फोटो काढू शकतो, पण मी तसे करत नाही.मी एका छोट्या योजनेकरिता झारखंडच्या छोट्या जिल्ह्यात जाऊन काम करतो.

ते पुढे म्हणाले की, मीडिया आता पहिल्या सारखा राहिलेला नाही.इतर लोकांप्रमाणे पत्रकार आता स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार करत आहेत.मीडियामध्ये कोण काय लिहितो, त्याचे विचार काय?, याचा पहिला कोण विचार करत न्हवते.मात्र, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.पूर्वी संवादाचे माध्यम म्हटले तर मीडिया हे एकच होते, पण आता संवादाची नवीन माध्यमे उपलब्ध झाली आहेत.आज जर तुम्हाला लोकांशी बोलायचे असेल तर संवाद हा दुतर्फा आहे. आज प्रसारमाध्यमांशिवायही जनता आपला आवाज पोहोचवू शकते. ज्याला उत्तर द्यायचे आहे तो देखील मीडियाशिवाय आपले विचार चांगल्या प्रकारे मांडू शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Exit mobile version