पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का भेट घेतली रबर गर्लची?

डाऊन सिन्ड्रोम असतानाही लवचिक शरीरामुळे अन्वी ओळखली जाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का भेट घेतली रबर गर्लची?

१४ वर्षीय अन्वी या रबर गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तिचे वैशिष्ट्य म्हणजे लवचिक शरीरामुळे ती रबर गर्ल म्हणून ओळखली जाते. गतिमंद असली तरी तिच्या लवचिकतेमुळे ती ओळखली जाते.

अन्वीचे वडील विजय झंझारुकिया यांनी आपल्या मुलीबद्दल सांगितले की, आम्ही सगळ्या आशा सोडल्या होत्या. पण नंतर आम्हाला अन्वीमधील ही लवचिकता दिसून आली. योगाने तिच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली. एक स्वप्न पूर्ण झाले.

विजय म्हणाले की, योगा हे वरदान आहे. सकाळी आणि संध्याकाळी तासभर ती योगाभ्यास करते. विविध स्पर्धांत ती इतर सामान्य मुलांसोबत भाग घेते. अनेक पुरस्कार तिने जिंकले आहेत. तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिच्या मोठ्या आतड्यावरही परिणाम झालेला आहे. बोलतानाही तिला त्रास होतो.

हे ही वाचा:

प्रभादेवीत झालेल्या राड्याप्रकरणी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांना अटक

आलिया भटला श्रेयस तळपदेने सुनावले

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे- ठाकरे समर्थक आमनेसामने, गोळीबार झाल्याचा दावा

मुंबई विमानतळावरून ६ कोटींच सोनं जप्त

गुजरातच्या सुरतची अन्वी ही डाऊन सिन्ड्रोमने ग्रस्त आहे. तिची ७५ टक्के बौद्धिक क्षमता नाहिशी झाली आहे. यंदा २४ जानेवारीला तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते दिल्लीत आले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालय गाठले. तिथे पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा तिने व्यक्त केली. तेव्हा पंतप्रधानांनीही तिला वेळ दिला आहे.

पंतप्रधानांच्या समोरच तिने योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमो दादा असे म्हणते. तिने प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारावर पंतप्रधानांची स्वाक्षरीही घेतली आहे. पंतप्रधानांना तिची ही प्रात्यक्षिके आवडली आणि गुजरातला आल्यावर तिची भेट घेणार असल्याचेही आश्वासन त्यांनी तिला दिले.

Exit mobile version