पॅरालिम्पिक पदकविजेत्या अवनीने पंतप्रधान मोदींना दिली भेट !

विजेत्या खेळाडूंनी पदकावर पंतप्रधानांची घेतली स्वाक्षरी

पॅरालिम्पिक पदकविजेत्या अवनीने पंतप्रधान मोदींना दिली भेट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१२ सप्टेंबर) पॅरीस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. क्रीडा मंत्रालयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पदक विजेत्यांशी बोलण्यापूर्वी त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. यावेळी खेळाडूंनी पंतप्रधानांना खास भेटवस्तू दिल्या. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा हिने पंतप्रधान मोदींना स्वाक्षरी असलेली भारतीय जर्सी भेट दिली. दरम्यान, पॅरीस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने एकूण २९ पदके जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

भारतीय खेळाडूंच्या संवादावेळी क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि भारतीय पॅरालिम्पिक समितीचे प्रमुख देवेंद्र झांझरिया हेही उपस्थित होते. खेळाडूंनी जिंकलेल्या पदकावर पंतप्रधान मोदी स्वाक्षरी करताना दिसले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल (एसएच १) प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखरा आणि जुडोमध्ये कांस्य पदक जिंकणारा कपिल परमार आणि इतर खेळाडू पंतप्रधान मोदींबरोबर फोटो काढताना दिसले. यावेळी परमार यांनी स्वतःच्या पदकावर पंतप्रधान मोदींची स्वाक्षरी देखील घेतली.

हे ही वाचा :

मशिदीचा अनधिकृत भाग सांगा आम्हीच काढून घेतो

धर्मांतरप्रकरणी मौलाना कलीम सिद्दीकी, मोहम्मद उमर गौतमसह १२ जणांना जन्मठेप

चार लाखांच्या सोनसाखळीसोबत बाप्पाच्या मूर्तीचं केलं विसर्जन आणि…

इस्लामच्या नावे चालत होते चैरिटी होम्स, देत होते बलात्काराची ट्रेनिंग, ४०० मुलांचा बचाव !

दरम्यान, पॅरीस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेसाठी ८४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत २९ पदके भारताच्या खात्यात जमा केली. मागील पॅरालिम्पिकचा इतिहास पाहिला तर पॅरीस पॅरालिम्पिकमधील ही कामगिरी सर्वोत्तम आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताने प्रथमच ७ सुवर्णपदके जिंकली आहेत.

दरम्यान, सर्व पदकप्राप्त खेळाडूंचा सरकारकडून गौरव करण्यात येत आहे. क्रीडा मंत्री  मांडविया यांनी सुवर्ण पदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख रुपये आणि कांस्य पदक विजेत्यांना ३० लाख रुपये दिले.

Exit mobile version