पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (५ एप्रिल ) आपल्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान १९९६ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या श्रीलंकेच्या संघाच्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांच्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण केले. पंतप्रधान मोदींनी सांगितले की या संघाच्या यशाने जगभरातील क्रीडाप्रेमींना प्रेरणा मिळाली आहे. श्रीलंकेच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी कोलंबोमध्ये कुमार धर्मसेना, अरविंदा डी सिल्वा, सनथ जयसूर्या, चामिंडा वास, उपुल चंदना आणि मारवन अटापट्टू यांच्यासह संघातील प्रमुख खेळाडूंशी संवाद साधला. १९९६ मध्ये आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून देणाऱ्या जयसूर्या यांनी बैठकीनंतर सांगितले की, मोदींशी बोलणे हा एक अद्भुत अनुभव होता.
या पथकाने पंतप्रधानांना एक विशेष स्मृतिचिन्ह देखील भेट दिले. पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूसोबतच्या संवादाचे काही फोटो एक्सवर शेअर केले. या भेटीबद्दल पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले की, “क्रिकेट कनेक्शन! १९९६ च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंकेच्या संघाला भेटून संवाद साधल्याने आनंद झाला. या संघाने लाखो क्रीडाप्रेमींना प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. १९९६ च्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला सात विकेट्सने हरवून इतिहास रचला होता.
हे ही वाचा :
उन्हाळ्यात या ५ टिप्स नक्की फॉलो करा, तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल; दिवसभर ताजेपणा राहील
लखनौ सुपर जायंट्सच्या गडयांवर दंडाचा थरार: पंत आणि दिग्वेश चर्चेत!
भारताचा रग्बी स्टार मोहित खत्री ठरला सर्वात महागडा खेळाडू; RPL सीझन १ ला जूनमध्ये धमाकेदार सुरुवात!
IPL 2025: पंजाबच्या मैदानावर राजस्थानचा दणदणीत विजय, ५० धावांनी किंग्जचा पराभव
पंतप्रधान मोदी आणि क्रिकेट संघाच्या या विशेष बैठकीनंतर, दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींच्या जागतिक आदराचे कौतुक केले, तर कालुविथरणा म्हणाले की भारत नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहील. तर सनथ जयसूर्याने या संवादाचे वर्णन एक उत्तम अनुभव म्हणून केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेसाठी आणि अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी पंतप्रधान शुक्रवारी श्रीलंकेला पोहोचले.
Cricket connect!
Delighted to interact with members of the 1996 Sri Lankan cricket team, which won the World Cup that year. This team captured the imagination of countless sports lovers! pic.twitter.com/2ZprMmOtz6
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2025