भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ९४ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील अडवाणी यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
अडवाणी यांचा हात धरून पंतप्रधानांनी त्यांना लॉनवर आणले आणि तिथे त्यांच्यासाठी खास केक ठेवण्यात आला होता. तो कापून अडवाणींचा वाढदिवस साजरा केला गेला. उपराष्ट्रपती, पंतप्रधान अशा सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून अडवाणी यांचे अभिनंदन केले. अडवाणी यांचे सर्व कुटुंबीयही तिथे उपस्थित होते.
अडवाणी यांचा जन्म कराचीचा. अगदी कमी वयातच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करायला प्रारंभ केला. १९४१मध्ये वयाच्या १४ वर्षी ते आरएसएसमध्ये दाखल झाले. कराचीच्या एका शाखेचे ते प्रचारक बनले. भारताच्या फाळणीनंतर ते राजस्थानात ते प्रचारक म्हणून गेले. १९५२पर्यंत त्यांनी अलवर, भरतपूर, कोटा, बुंदी आणि झालावाड येथे प्रचारक म्हणून काम केले. ८०च्या दशकात त्यांनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली. त्यानंतर भारतात भाजपाचा जनाधार वाढत गेला. त्यामुळेच रामजन्मभूमीचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
हे ही वाचा:
‘सुशासन पर्व’: विषय दिवाळी अंकाचा, न्यूज डंकाचा
सीआरपीएफ जवानाने आपल्याच चार सहकाऱ्यांना गोळ्या घातल्या
रुग्णालयांमधील आगींच्या घटनेत दीड वर्षात गेले ५१ बळी
अडवाणी यांनी १९६५मध्ये कमला अडवाणी यांच्याशी विवाह केला. त्यांची दोन मुले आहेत जयंत आणि प्रतिभा. २०१६ला त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
प्रधानमंत्री श्री @narendramodi, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda समेत पार्टी के अन्य वरिष्ठ नेताओं ने आज पार्टी के मार्गदर्शक और हमारे प्रेरणास्रोत आदरणीय श्री लाल कृष्ण आडवाणी जी के जन्मदिन पर उनके आवास पर पहुंच कर उन्हें शुभकामनाएं दी। pic.twitter.com/D2XAkvRveH
— BJP (@BJP4India) November 8, 2021
अमित शहा यांनी ट्विट करत अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या. भाजपाच्या विचारधारेला जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अडवाणी यांनी केले. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा. आपल्याला दीर्घ आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.