पंतप्रधान मोदींनी पूल दुर्घटनेतील जखमींची केली विचारपूस

पंतप्रधान मोदींनी पूल दुर्घटनेतील जखमींची केली विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी, गुजरात येथे भेट देऊन पूल दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली तसेच जखमींची विचारपूस केली.

मोरबी येथील झुलता पूल म्हणून ओळखला जाणारा पूल कोसळून त्यात १३५ लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पुलावर प्रमाणापेक्षा अधिक लोक जमा झाल्यानंतर त्यांच्या वजनाने आणि पुलाची दुरुस्ती व्यवस्थित झालेली नसल्याने हा अपघात घडला. यासंदर्भात कंत्राटदारासह पुलाशी संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले अशा परिवारातील २६ जणांना मोदी भेटणार आहेत. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयालाही मोदी यांनी भेट दिली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. पडलेल्या पुलाच्या ठिकाणी मोदी गेले आणि तेथे नेमकी घटना कशी घडली, कोणत्या प्रकारचे दोष तिथे आहेत, पूल कोसळण्यामागील कारणे काय आहे, नेमकी तिथे परिस्थिती काय आहे, याची माहितीही त्यांनी घेतली.

हे ही वाचा:

फडणवीस म्हणाले, खोटा नरेटिव्ह तीन दिवस चालतो

भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन होणार ट्विटरचे सीईओ ?

खोटे ‘सोने’ देऊन २० लाखांना फसवले

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

 

त्यानंतर मोदी रुग्णालयातही गेले. तिथे त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. त्यांना उपचार कसे मिळत आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, याची विचारपूस पंतप्रधानांनी केली.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेदेखील पंतप्रधानांसोबत होते. या घटनेनंतर बचावकार्यासाठी बोलावलेल्या विविध दलांशीही पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांनाही प्रोत्साहन दिले.

माच्छू नदीवर हा पूल होता. अत्यंत जुना पूल असल्यामुळे काही काळासाठी तो बंद होता पण ऑक्टोबर महिन्यात त्याची डागडुजी करून तो तात्काळ लोकांसाठी खुला करण्यात आला होता. खरे तर त्याची कोणतीही फिटनेस चाचणी न करताच तो खुला करण्यात आल्यामुळे ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात कंत्राटदारावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

Exit mobile version