महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला पुन्हा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मागील दौऱ्यात पंतप्रधानांनी मुंबईकरांना मेट्रोची भेट दिली होती. सध्या महाराष्ट्रात दोन वंदे भारत गाड्या धावत आहेत. पंतप्रधान येत्या १० फेब्रुवारीला एकाच वेळी दोन वंदे भारत एक्सप्रेसचे भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर ते मुंबई दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ करतील. एकाचवेळी दोन वंदे भारत गाडयांना हिरवा कंदील दाखवण्याची ही पहिलीच वेळ असेल.
महाराष्ट्रात दोन वंदे भारत गाड्या सुरू आहेत. एक गाडी मुंबई ते अहमदाबाद आणि दुसरी नागपूर ते विलासपूर अशी धावत आहे. यामध्ये आता नवीन दोन वंदे भारताची भर पडणार आहे. एकाच वेळी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवू शकतात. दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील.
सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून दुपारी ३ वाजता आपल्या पहिल्या प्रवासात निघेल, असे मानले जाते. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाडमार्गे शिर्डीला पोहोचेल. तर सोलापूर-सीएसएमटी हा प्रवास सोलापूरहून असेल. सोलापूरहून दुपारी ३ वाजता सुटून कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादरमार्गे सीएसएमटीला पोहोचेल.
हे ही वाचा:
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे आहे हे ब्रह्मास्त्र !
शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी
अर्थसंकल्पात या गोष्टींमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत
ठाकरे गट हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे?
बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
या १६ डब्यांच्या या गाड्यांमध्ये १,१२८ प्रवासी प्रवास करू शकतात. वंदे भारत २०० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. परंतु रेल्वे बोर्डाने सध्या त्यांची मर्यादा १६० किमी प्रतितास इतकी ठेवली आहे. पंतप्रधान वंदे भारत ला हिरवा झेंडा दाखवण्याबरोबरच बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारअसल्याची माहिती मिळत आहे. बोहरी समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन या कार्यक्रमाची माहिती त्यांना दिली आहे.