अब की बार १० करोड पार !

पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स, बनले जागतिक नेता

अब की बार १० करोड पार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी १०० दशलक्ष फॉलोअर्ससह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनून एक नवीन मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. गेल्या तीन वर्षात पंतप्रधान मोदींच्या एक्स अकाउंटवरील फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (३८.१ दशलक्ष अनुयायी), दुबईचे शासक शेख मोहम्मद (११.२ दशलक्ष अनुयायी) आणि पोप फ्रान्सिस (१८.५ दशलक्ष अनुयायी) यांसारख्या जागतिक नेत्यांना पंतप्रधान मोदींनी खूप मागे सोडले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटकरत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, “या ज्वलंत माध्यमात राहून खूप आनंद झाला आणि चर्चा, वादविवाद, अंतर्दृष्टी, लोकांचे आशीर्वाद, रचनात्मक टीका आणि बऱ्याच गोष्टींचा आनंद घेतो. भविष्यात अशाच आकर्षक काळाची मी वाट पाहत आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

हे ही वाचा:

पोटगीबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल, सर्व पीडित मुस्लिम महिलांना लागू होईल काय?

साताऱ्याच्या ‘चंदन वंदन गडावर’ही मजार, दर्गा !

पोटनिवडणुकात विरोधकांनी आपल्या जागा राखल्या, भाजपाला हरवले नाही!

‘विशाळ गड’ घेणार मुक्त श्वास, कारवाईला उद्यापासून सुरुवात !

दरम्यान, भारतीय नेत्यांच्या फॉलोअर्सच्या बाबतीतही पंतप्रधान मोदी पुढे आहेत. राहुल गांधी यांचे २६.४ दशलक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २७.५ दशलक्ष, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे १९.९ दशलक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ७.४ दशलक्ष अनुयायी आहेत. आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांचे ६.३ दशलक्ष आणि तेजस्वी यादव यांचे ५.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे २.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Exit mobile version