पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या हिंदू मंदिराचे होणार उदघाटन

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (१३ फेब्रुवारी) दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यावर रवाना झाले आहेत. युएईच्या या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत आणि अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील.

पंतप्रधान मोदींची ही २०१५ पासूनची पंतप्रधानांची यूएईची सातवी भेट असणार आहे. यूएईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांना भाऊ म्हणून संबोधले आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

यूएईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते.पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “पुढील दोन दिवसांत, मी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी यूएई आणि कतारला भेट देणार आहे.यामुळे दोन्ही देशाचे संबंध अधिक चांगले होतील.पदभार स्वीकारल्यापासून ही माझी सातवी UAE भेट असणार आहे.

हे ही वाचा:

बनावट हलाल सर्टिफिकेट देणाऱ्यांच्या उत्तर प्रदेश एसटीएफने आवळल्या मुसक्या

पाकिस्तानवर कर्जाचा वाढता बोजा; गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढ

जम्मू-काश्मीरच्या माजी आमदार शहनाज गनई यांचा भाजपमध्ये प्रवेश!

सरफराज खान याचे कसोटी पदार्पण निश्चित

मी आमचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना भेटण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.UAE मधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला आहे.अबुधाबी येथे एका सामुदायिक कार्यक्रमात मी भारतीय समुदायाला संबोधित करणार आहे.मी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्येही बोलेन आणि दुबईत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना भेटणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे वेळापत्रक
१३ फेब्रुवारी
– पंतप्रधान मोदी ११.३० वाजता दिल्लीहून युएईला रवाना होतील.
– पंतप्रधान मोदी दुपारी ४ वाजता अबुधाबीला पोहोचतील.
-दुपारी ४ ते ५:३० दरम्यान अबुधाबीमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
– रात्री ८ ते ९.३० या वेळेत अहलान मोदी समुदायाचा कार्यक्रम होईल, जिथे पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान उपस्थित राहणार आहेत.

१४ फेब्रुवारी
-परराष्ट्र मंत्रालयाची ब्रिफींग अबूधाबीमध्ये सकाळी ९.२० वाजता होणार आहे.
-पंतप्रधान मोदी दुपारी १.५० ते २.१० या वेळेत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये सहभागी होतील.
-संध्याकाळी ६ ते ९ च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी युएईमधील बीएपीएस मंदिराचे उदघाटन करतील.

Exit mobile version