पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बडोदा येथे सी-२९५ वाहतूक विमान निर्मिती सुविधेची पायाभरणी केली. पायाभरणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, ‘मेक इन इंडिया, मेक फॉर ग्लोब या मंत्रावर भारत आज पुढे जात आहे आणि आपली क्षमता आणखी उंचावत पुढे नेत आहे. आता भारत वाहतूक विमानांचाही मोठा उत्पादक बनणार आहे. भारतात त्याची आज सुरुवात होत आहे. आणि मी तो दिवस बघतोय जेव्हा जगातील सर्वात मोठे प्रवासी विमानाचे उत्पादनही भारतात केले जाईल.
येथे तयार होणारी वाहतूक विमाने केवळ आपल्या सैन्याला बळच देणार नाहीत तर विमान निर्मितीमध्ये एक नवीन परिसंस्था विकसित करेल. लवकरच भारत मेक इन इंडिया टॅगसह बनवले जाणाऱ्या प्रवासी विमानाच्या उत्पादनाचा साक्षीदार बनेल. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले , शिक्षण आणि संस्कृती ची ओळख असणारे बडोदा आता हवाई वाहतूक क्षेत्राचे केंद्र म्हणून नवीन ओळख निर्माण करेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘आज भारताला जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने आम्ही एक मोठे पाऊल उचलत आहोत. आज भारत स्वतःचे लढाऊ विमान, रणगाडे , पाणबुडी बनवत आहे. इतकंच नाही तर भारतात बनवलेली औषधे आणि लसही जगातील लाखो लोकांचे प्राण वाचवत आहेत.
हे ही वाचा:
सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी
गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत
…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली
यूपीएच्या भोंगळ संरक्षण धोरणाचे दौलत बेग ओल्डी एअर बेसवर दफन
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ वाहतूक विमाने टाटा-एअरबसद्वारे तयार केली जातील. संरक्षण सचिव अरमान गिरीधर यांच्या म्हणण्यानुसार, ४० विमानांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त, वडोदरातील ही सुविधा हवाई दलाच्या गरजा आणि निर्यातीसाठी अतिरिक्त विमाने तयार करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.