‘तुम्ही नव्या भारताचे प्रतिबिंब’…मोदींनी साधला ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद

‘तुम्ही नव्या भारताचे प्रतिबिंब’…मोदींनी साधला ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, १३ जुलै रोजी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी या सर्वच खेळाडूंना शुभेच्छा आणि प्रोत्साहन दिले. हा सर्व कार्यक्रम खूपच अनौपचारिक पद्धतीने पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या सर्व खेळाडूंच्या कुटुंबियांनी केलेल्या जागा बद्दल त्यांचे आभार मानले. तर काही खेळाडूंच्या कुटुंबीयांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही दिवसांत #Cheer4India सोबत अनेक फोटो मला पहायला मिळाले. सोशल मीडियापासून ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सारा देश तुमच्यासाठी उभा आहे. १३५ करोड भारतीयांच्या शुभेच्छा खेळाच्या मैदानात उतरण्यापूर्वी साऱ्या देशाचा आशिर्वाद तुमच्यासाठी आहेत. तुमच्यात Discipline, Dedication आणि Determination हे समान गुण आहेत. तर तुमच्यात Commitment आणि Competitiveness पण आहेत हेच New India चे गुण आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे नव्या भारताचे प्रतिबिंब आहेत.

हे ही वाचा:

प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी

आसाममध्ये येणार नवा गोरक्षण कायदा

मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रांत फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात काय?

गोखलेला न्यायालयाने ठोकले

तुम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहात की देश आज एका नव्या विचारासह आणि दृष्टीकोनसह आपल्या प्रत्येक खेळाडूसोबत उभा आहे. आज देशासाठी तुमचे प्रोत्साहन महत्वपूर्ण आहे. तुम्ही मोकळेपणे खेळू शकाल, तुमच्या संपूर्ण सामर्थ्यासोबत खेळू शकाल, टेकनिकला आणखी योग्य बनवू शकाल याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारताचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. पहिल्यांदाच एवढ्या जास्त प्रमाणात क्रिडा प्रकारांमध्ये भारत सहभाग नोंदवत आहे. तर अनेक खेळ असे आहेत ज्यात भारत पहिल्यांदाच सहभाग नोंदवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार १३ जुलै रोजी ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या शमशी संवाद साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी या सर्वच खेळाडूंना शुभेच्छा आणि प्रोत्साहन दिले. हा सर्व कार्यक्रम खूपच अनौपचारिक पद्धतीने पार पडला.

तरुण भारताचा आत्मविश्वास आणि उर्जा पाहून आशावाद व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, तो दिवस लांब नाही ज्यादिवशी फक्त विजयच नव्या भारताच्या सवयीचा होईल, त्यांनी खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्याचा सल्ला देत देशवासियांना ‘Cheer4India’ चे आवाहन केले.

Exit mobile version