26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषपंतप्रधानांची जनतेशी पुन्हा ‘मन की बात’

पंतप्रधानांची जनतेशी पुन्हा ‘मन की बात’

पॅरिस ऑलिम्पिक, केरळच्या छत्र्या, वृक्षसंवर्धन अशा विविध मुद्द्यांना केला स्पर्श

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीमुळे फेब्रुवारी महिन्यात मन की बात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनसंवादाचा कार्यक्रम थांबला होता. पण पुन्हा एकदा तो सुरू झाला असून त्यात पंतप्रधानांनी आपण गेले काही महिने हा संवाद करू शकलो नाही याबद्दल खंत व्यक्त करतानाच पुन्हा हा संवाद सुरू झाला आहे आणि मी आता पुन्हा तुम्हाला भेटू शकतो, असे म्हटले आहे.

मोदींनी मन की बातच्या या कार्यक्रमात म्हटले की, खूप मोठी विश्रांती घेतली. संवाद हुकल्याची जाणीव होत होती. अखेर गेल्या फेब्रुवारीपासून तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत होता, तो दिवस आला आहे. मी पुन्हा एकदा तुमच्यात आलो आहे. आपल्या कुटुंबासोबत आलो आहे. शिवाय, पावसाचे आगमन झाले आहे त्यामुळेही तुम्ही खुश आहात.

मोदी म्हणाले की, मला आनंद होतो आहे की, तुम्ही मला लाखांच्या संख्येने संदेश पाठवलेत. मन की बात हा कार्यक्रम काही काळ थांबला असला तरी देशकार्य सुरू होते, समाजातील अनेक चांगली कामे सुरू होती. आज मी देशवासियांना धन्यवाद देतो की, त्यांनी संविधानावरील आपली श्रद्धा त्यांनी दाखवून दिली. २०२४ची निवडणूक ही जगातील मोठी निवडणूक होती. जगातील कोणत्याही भागात अशी निवडणूक होत नाही. मी निवडणूक आयोग आणि या संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे आभार मानतो.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंना का वाटतेय बहुमजली झोपड्यांची चिंता?

टीम इंडियाच्या ‘ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम’ विराटबद्दल नेटिझन्सकडून कृतज्ञता

खोट्या बातम्यांमुळे मिड-डे, राजदीप सरदेसाई, ध्रुव राठीविरुद्ध तक्रार

‘सूर्या’ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मन की बातमध्ये ज्या मुद्द्यांना स्पर्श केला त्यातील काही मुद्दे असे-

वीर सिद्धू कान्हू यांनी आपली सर्व ताकद लावून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत ब्रिटिशांना लढा दिला. हे कधी झाले तुम्हाला ठाऊक आहे का ?  १८५५मध्ये हे घडले. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दोन वर्षे आधी. पहिले स्वातंत्र्ययुद्ध १८५७ला लढले गेले. झारखंडच्या संथल परगण्यातील आपले आदिवासी बंधूभगिनी शस्त्र घेऊन ब्रिटिशांविरोधात युद्धात उतरले.

मोदींनी वृक्षसंवर्धनाचा संदेशही यानिमित्ताने दिला. ते म्हणाले की, तुम्ही जर मला विचाराल की कोणते नाते हे अधिक अमूल्य असते तर मी सांगेन की आईचे नाते. आपल्या सगळ्यांच्या जीवनात आईचे स्थान वरचे असते. अनेक वेदना सहन करत आई आपल्या मुलांना वाढवते. मुलांना ती जन्म देते ते त्यांच्यावरील ऋण असते. कुणीही ते ऋण फेडू शकत नाही. या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक पेड माँ के नाम ही चळवळ आपण सुरू केली आहे. माझ्या आईच्या नावे मी एक झाड लावले आहे.

 

केरळच्या आगळ्यावेगळ्या छत्र्या

 

मोदींनी विशेष तऱ्हेच्या छत्र्यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, केरळमध्ये विशेष प्रकारच्या छत्र्या तयार केल्या जातात. केरळच्या संस्कृतीत या छत्र्यांना वेगळे महत्त्व आहे. केरळच्या अट्टापडीमध्ये कार्थुम्बी छत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. केरळच्या आदिवासी महिला या छत्र्या तयार करतात. या छत्र्यांना देशभरात आता मागणी वाढत आहे. त्या ऑनलाइनही उपलब्ध आहेत. वत्तालाकी सहकारी शेती संस्थेच्या माध्यमातून त्या उपलब्ध करून दिल्या जातात.

पंतप्रधानांनी खेळाडूंचीही दखल यानिमित्ताने घेतली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपण दमदार कामगिरी केली. आता आपले खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकची तयारी करत आहेत. जर सगळ्या खेळाडूंच्या बाबतीत पाहायचे झाले तर ९०० खेळाडू विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात खेळले आहेत.

रवींद्रनाथ टागोरांचा तुर्कमेनिस्तानमध्ये गौरव

पंतप्रधानांनी गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांचा तुर्कमेनिस्तानमध्ये होत असलेल्या गौरवाविषयीही उल्लेख केला. तुर्कमेनिस्तानमध्ये जगातील २४ प्रसिद्ध कवींच्या प्रतिमांचे अनावरण झाले. आपल्यासाठी ही गौरवाची गोष्ट आहे की, त्यातील एक प्रतिमा ही रवींद्रनाथ टागोर यांची आहे. हा गुरुदेवांचा आणि देशाचा गौरव आहे, असे मोदी म्हणाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा