देशातील सर्वात लांब केबल पुल ‘सुदर्शन सेतू’चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन!

रहिवासी आणि द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा पूल ठरणार महत्त्वाचा

देशातील सर्वात लांब केबल पुल ‘सुदर्शन सेतू’चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात लांब केबल पुलाचे उदघाटन केले आहे.’सुदर्शन सेतू’ असे या पुलाचे नाव आहे.या पुलाला ओखा-बेट द्वारका सिग्नेचर असेही ओळखले जाते.रहिवासी आणि द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी पंतप्रधान मोदींनी द्वारका मंदिरात विशेष प्रार्थना केली.यानंतर पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वात लांब ‘सुदर्शन सेतू’ या केबल पुलाचे उदघाटन केले.हा केबल पूल ओखा ते समुद्राच्या मध्यभागी वसलेल्या बेट द्वारकाला जोडणारा आहे.या ‘सुदर्शन सेतू’ पुलाची लांबी २.३२ किलोमीटर इतकी असून देशातील सर्वात लांब केबल पूल आहे.

हे ही वाचा:

‘मोदीजींनी घरात भांडण लावून दिले, असे तर होणार नाही ना?’

‘आज कोणीही मनमानीपणे आपल्या इच्छेविरोधात व्हिटो करू शकत नाही’!

वडेट्टीवारांनी केले जरांगेंच्या भाजपा प्रवेशाचे सुतोवाच…

“लोणावळ्यातील सभेवेळी जरांगेनी बंद दाराआड कोणती डील केली?”

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २०१६ साली या पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिली होती.७ ऑक्टोबर २०१७ रोजी पंतप्रधान मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती.सुरवातीला या पुलाचा खर्च ९६२ कोटी रुपये इतका होता होता, मात्र नंतर तो वाढवण्यात आला.

‘सुदर्शन सेतू’च्या वैशिष्ठे
‘सुदर्शन सेतू’ हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे.या पुलाच्या बांधकामावर ९७९ कोटी रुपये इतका खर्च आला आहे.ओखा-बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज म्हणूनही ओळखले जाते.चौपदरी असलेल्या २७.२० मीटर रुंद पुलाच्या दोन्ही बाजूला २.५० मीटर रुंद पदपथ आहे.या पुलावर श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सजवलेला फूटपाथ आहे.यासोबतच यामध्ये एक मेगावॉट वीज निर्माण करण्याची क्षमता असलेले सोलर पॅनलही बसवण्यात आले आहेत.’सुदर्शन सेतू’ पूल स्थानिक रहिवासी द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Exit mobile version