पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १६ जुलै रोजी अनेक महत्वाच्या विकास प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी कायापालट झालेल्या गांधीनगर स्थानकाचेही लोकार्पण करण्यात आले. तर त्यासोबतच गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. व्हर्च्युअल माध्यमातून हा सारा कार्यक्रम पार पडला.
गांधीनगर स्थानकाचा झालेला नवनिर्माण हा खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या स्थानकाचे फोटो पाहिल्यावर हे रेल्वे स्थानक आहे यावर आधी विश्वास ठेवणे कठीण जाते. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असणारे हे स्थानक देशातील सर्वात अद्ययावत असे रेल्वे स्थानक ठरणार आहे.
हे ही वाचा:
लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या
“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”
पंतप्रधान मोदींनी केले रोबोटिक्स आणि ॲक्वेटिक्स गॅलरीचे लोकार्पण
काय आहेत नव्या गांधीनगर स्थानकाची वैशिष्ट्ये?
या नव्या गांधीनगर स्थानकामध्ये एक पंचतारांकित हॉटेल असणार आहे. ७४०० चौरस मीटर इतके या पंचतारांकित हॉटेलचे क्षेत्रफळ आहे. यामध्ये ३१८ खोल्या आहेत. तर या व्यतिरिक्त रेल्वे प्रवाशांसाठी अद्ययावत असा वेटिंग लॉन्ज आहे. हा वेटिंग लॉन्ज संपूर्णपणे वातानुकूलित असून इथे ४० जणांच्या बसण्याची सुविधा करण्यात आली आहे. या स्थानकात एकूण तीन उद्वाहक आहेत. तर त्यासोबत दोन स्वयंचलित जिने सुद्धा आहेत. याबरोबरच दोन फलाटांना जोडणारा भुयारी रस्ता सुद्धा तयार करण्यात आला आहे. या सर्व सुविधांच्या बरोबरच विमानतळाप्रमाणे गांधीनगर रेल्वे स्थानकातही सर्व धर्माच्या प्रवाशांच्या प्रार्थनेसाठी एका विशिष्ट हॉलची सोय करण्यात आली आहे.