भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सुरू!

पंतप्रधान मोदींनी केले उदघाटन, मुलांसह मारली फेरी

भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सुरू!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (६ मार्च) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे ‘भारतातील पहिल्या-वहिल्या पाण्याखालील मेट्रो’ मार्गाचे उद्घाटन केले.ही मेट्रो हावडा मैदान आणि एस्प्लेनेड यांच्या दरम्यान धावणार आहे. तसेच १५,४०० कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.दरम्यान, देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाकडे देशाची वाटचाल दर्शवणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो सेक्शन, कवि सुभाष स्टेशन-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि ताराताला-माझेरहाट मेट्रो सेक्शनचे उद्घाटन केले.गळी नदीच्या खालून धावणारी देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो रेल्वे नदी आणि हावडा शहराला कोलकाता शहराशी जोडेल. कोलकाता मेट्रोचा हावडा मैदान-एस्प्लेन्ड मेट्रो भुयारी मार्ग कोणत्याही नदीखाली बनणारा पहिला भुयारी मार्ग आहे. याचबरोबर हावडा मेट्रो स्थानक भारताचे सर्वांत खोल मेट्रो स्थानक आहे. तर, रेल्वे रूळ, फलाटांच्या वर उभारले गेलेले माजेरहाट मेट्रो स्थानक हे एकमेव स्थानक आहे.

हे ही वाचा:

२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ

‘मेटा’ ठप्प झाल्यामुळे कंपनीला १०० मिलियन डॉलर्सचं नुकसान

पाकिस्तानी क्रिकेटपटू घेणार लष्करी प्रशिक्षण

बंगळूरूमधील पाणी संकटाची झळ थेट कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना

पंतप्रधान मोदींनी अंडरवॉटर मेट्रोचे उदघाटन केल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसोबत पहिली फेरी घेतली.मेट्रो ट्रेनच्या आवारातील एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्या शेजारी बसलेल्या शाळकरी मुलांशी संवाद साधताना दिसत आहेत, तर काही त्यांच्याजवळ उभे होते.तसेच पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक मेट्रो कर्मचारीही पंतप्रधानांसोबत मेट्रो ट्रेनमध्ये उपस्थित होते.उदघाटन सोहळ्याला वरिष्ठ अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, कोलकाता मेट्रोचे काम सन १९७०च्या सुमारास सुरू झाले होते. मात्र, मोदी सरकारने गेल्या १० वर्षांच्या काळात गेल्या ४० वर्षांच्या तुलनेत अधिक चांगले काम केले आहे. पंतप्रधानांचे लक्ष २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र तयार करण्याचे आहे. त्यासाठीच देशातील पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. या वर्षांत मेट्रोसेवेचे काम अनेक टप्प्यांत पुढे गेले. सद्यस्थितीत पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडोरसाठी नदीखालून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती.

Exit mobile version