24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषपंतप्रधान म्हणाले, तामिळनाडू म्हणजे मेक इन इंडियाचा ब्रँड अँबेसेडर!

पंतप्रधान म्हणाले, तामिळनाडू म्हणजे मेक इन इंडियाचा ब्रँड अँबेसेडर!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते टर्मिनलचे उद्घाटन

Google News Follow

Related

दोन दिवसांच्या दक्षिण दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी मंगळवारी तिरुचिरापल्ली येथे पोहोचले. या दौऱ्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. यासोबत त्यांनी तिरुचिरापल्ली विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि राज्यपाल आरएन रवी यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी भाजपचे अनेक दिग्गज नेतेही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुचिरापल्ली विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी सीएम स्टॅलिन, राज्यपाल आरएन रवी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील उपस्थित होते. त्यानंतर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी प्रार्थना करतो की सर्वांसाठी २०२४चे वर्ष शांतीपूर्ण आणि समृद्धीचे जावो. ही सौभाग्याची गोष्ट की, माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम २०२४ मध्ये तामिळनाडू मध्ये होत आहे.आज जवळजवळ २०,००० हजार करोड रुपयांची विकास परियोजना सुरु करण्यात येणार आहे, ज्याने तामिळनाडूच्या प्रगतीला चालना मिळेल.मी आपणास या परियोजनांसाठी शुभेच्या देतो.

हे ही वाचा:

जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!

कर्नाटकचा अजब कारभार; ३१ वर्षांनी कारसेवकाला अटक!

संगीत क्षेत्रातील दर्दी अभ्यासक बाबानंद धोपटे कालवश

अंबिका मसालेच्या अध्यक्षा कमल परदेशी यांचे निधन

केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांत तामिळनाडूला १२० लाख कोटी रुपये दिले
तिरुचिरापल्ली येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, २००४-२०१४ दरम्यान तामिळनाडूला केंद्राकडून ३० लाख कोटी रुपये मिळाले होते, परंतु आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत तामिळनाडूला १२० लाख कोटी रुपये दिले आहेत. आम्ही तामिळनाडू सरकारला अडीचपट जास्त पैसे दिले आहेत.

मेक इन इंडियाचा ब्रँड अँबेसेडर बनत आहे तामिळनाडू
पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले की, आज भारताचा समावेश अव्वल पाच अर्थव्यवस्थांमध्ये झाला आहे, आज भारत जगामध्ये एक नवी आशा बनून उदयास आला आहे! मोठमोठे गुंतवणूकदार देशात गुंतवणूक करत आहेत आणि त्याचा फायदा तामिळनाडू आणि देशातील जनतेला होत आहे! तामिळनाडू मेक इन इंडियाचा ब्रँड अँबेसेडर बनला आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले पुढे म्हणाले , ‘गेल्या एका वर्षात ४० हून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी ४०० हून अधिक वेळा तामिळनाडूला भेट दिली आहे. जेव्हा तामिळनाडू वेगाने प्रगती करेल तेव्हा देशाचाही वेगाने विकास होईल.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा