आज आधुनिक भारताची प्राणप्रतिष्ठापना झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सेंट्रल व्हिस्टाचे उद्घाटन

आज आधुनिक भारताची प्राणप्रतिष्ठापना झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या रस्त्याचे ‘कर्तव्य पथ’ उद्घाटन केल्यानंतर संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आधुनिक भारताची प्राणप्रतिष्ठापना झाली. वसाहतवादाचे प्रतीक ‘किंग्स वे’ हा आता इतिहास बनला आहे आणि तो कायमचा पुसला गेला आहे. पंतप्रधान म्हणाले की, कर्तव्य मार्गाच्या रूपाने एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. वसाहतवादाच्या आणखी एका प्रतिकावर मात केल्याबद्दल मी देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान मोदींच्या हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या ड्रीम प्रोजेक्टच्या एका भागाचे आज उद्घाटन करण्यात आले. आज, इंडिया गेटजवळ, पंतप्रधान मोदींनी त्यांचे प्रेरणास्थान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा समर्पित केला. इंडिया गेट दीड वर्षांहून अधिक काळ सर्वसामान्यांसाठी बंद होते. आज उद्घाटनानंतर सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामुळे इंडिया गेट आणि आजूबाजूची जागा बंद करण्यात आली होती.

मोदी पुढे म्हणाले की, गेल्या ८ वर्षात आम्ही असे अनेक निर्णय घेतले ज्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छाप होती. अंदमान आणि निकोबार बेटांवर राष्ट्रध्वज फडकवणारे ते ‘अखंड भारत’चे पहिले प्रमुख होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आज इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. ब्रिटिश राजवटीत येथे इंग्रजांच्या प्रतिनिधीचा पुतळा उभा होता. नेताजींच्या पुतळ्याच्या स्थापनेने आम्ही सशक्त भारताचा नवा मार्ग निश्चित केला आहे.

हे ही वाचा:

सॅल्युट आशाताई!

आईकडून तिने घेतला सोनसाखळी चोरीचा वारसा

पहिल्यांदाच ठाकरेंविरोधात कुणी ‘मैदाना’त उतरलंय!

याकुब मेमनची कबर का बनते आहे मजार?

पंतप्रधान म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताने सुभाषबाबूंचा मार्ग अवलंबला असता, तर आज देश किती उंचीवर असता! पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपल्या या महान नायकाचा विसर पडला. त्याच्या कल्पना, त्याच्याशी निगडित प्रतीकांकडेही दुर्लक्ष झाले.

कर्तव्य मार्गात दिसेल भविष्यातील भारत

पंतप्रधान म्हणाले, मी देशातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो, मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. चला या नव्याने बांधलेला कर्तव्य मार्ग पाहू या. या बांधकामात तुम्हाला भविष्यातील भारत दिसेल. इथली ऊर्जा तुम्हाला आमच्या विशाल राष्ट्रासाठी एक नवीन दृष्टी देईल, एक नवीन विश्वास देईल.

Exit mobile version