23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष३० लढाऊ विमाने वाहून नेणारी 'विक्रांत' नौदलात दाखल

३० लढाऊ विमाने वाहून नेणारी ‘विक्रांत’ नौदलात दाखल

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याहस्ते लाेकार्पण

Google News Follow

Related

भारताच्या भविष्यातील आव्हानांना सक्षमपणे ताेंड देण्यास समर्थ असलेल्या आययएनएस विक्रांत ही स्वदेशी बनावटीची युद्धनाैकेचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याहस्ते लाेकार्पण करण्यात आली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन करण्यात आलेली ही देशातील सर्वात माेठी युद्ध नाैका आहे. ही युद्धनाैका ताफ्यात आल्यामुळे नाैदलाची ताकद दुपटीने वाढली आहे. समुद्रातील बाहुबली म्हणून ओळखली जाणारी ही युद्धनाैका २६२ मीटर लांब, १५ मजले उंच आणि ४५ हजार टन वजनाची आहे.

ही युद्धनाैका ५३ एकरावर पसरलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची ३० लढाऊ विमाने या युद्धनाैकेवरून उड्डाण करू शकतात. आएनएस विक्रांतमध्ये २३०० केबिन आहेत. या युद्धनाैकेचे वजन ४५ हजार टन असून रुंदी ६२ मीटर इतकी आ हे. या युद्धनाैकेवर ८८मेगावॅट क्षमतेचे चार गॅस टर्बाइन बसविण्यात आले आहेत. याचा कमाल वेग २८ नाॅटस इतका आहे. तब्बल ७६ टक्के स्वदेशी घटकांचा वापर करून या युद्धनाैकची निर्मिती करण्यात आली आहे. कमी जागेत टेक ऑफ आणि लॅंडिंग शक्य हाेऊ शकेल अशा खास प्रकारे या युद्ध नाैकेची निर्मिती करण्यात आली अाहे. त्यासाठी शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड लॅंडींग अशी खास रचना करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला

सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट

बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

क्रू, महिलांसाठी खास व्यवस्था

हे विशाल जहाज एकूण १८ मजले असून त्यात २४०० कप्पे बांधण्यात आले आहेत. १६०० क्रू येथे राहू शकतात. यामध्ये महिलांच्या गरजेनुसार खास केबिन बनवण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे आयएनएस विक्रांतमध्ये आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वयंपाकघर आहे, ज्यामध्ये एक युनिट ताशी ३ हजार पाेळ्या तयार करू शकते.
युद्धनाैकेच्या मेडिकल काॅम्प्लेक्समध्ये आधुनिक ऑपरेशन थिएटरसह १६ बेड आहेत. तसेच फिजिओथेरपी क्लिनिक, आयसीयू, पॅथॉलॉजी, सीटी स्कॅनरसह रेडिओलॉजी विंग आणि एक्स-रे मशीन, डेंटल आणि आयसोलेशन सुविधा आहेत.

किती विमानांची क्षमता आहे

आयएनएस विक्रांतमध्ये ३० विमानांचा समूह सामावून घेऊ शकतो. मिग -२९ के लढाऊ विमाने, कामोव्ह-३१ हेलिकॉप्टर, एमएच -६० आर मल्टी-रोल हेलिकॉप्टर आणि हलकी लढाऊ विमाने. ब्रह्मोस क्षेपणास्त्र देखील समुद्रात शत्रूंना मात देण्यासाठी या वाहकांवर तैनात केले जाऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा