सर्वसामान्य लोक आता सौरऊर्जेला सरावलेत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जेचे महत्त्व मन की बातमधून सांगितले आणि सौरऊर्जेचा वापर करणाऱ्यांची दखल घेतली

सर्वसामान्य लोक आता सौरऊर्जेला सरावलेत!

मन की बातच्या ९९व्या भागात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय ऊर्जेच्या विषयाला स्पर्श केला. नरेंद्र मोदी म्हणाले कि, भारत सौरऊर्जेच्या क्षेत्रांत ज्या वेगाने पुढे जात आहेत ती खूप मोठी उपलब्धता असून आज जगभरात स्वच्छ ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा याची खूप चर्चा आहे. जगभरात या क्षेत्रातील आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल सगळीकडे बोलत आहेत. आपल्याकडे लोकांना सौर उर्जेचे महत्व कळले आहे. स्वच्छ ऊर्जेसाठी सगळेजण योगदान देऊ इच्छितात. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

भारताच्या सौर मोहिमेला ‘सबका प्रयास’हि भावना पुढे नेत असल्याचे मोदी म्हणाले. महाराष्ट्रातल्या पुणे मधल्या ऑलिव्ह हाऊसिंग सोसायटीचे उदाहरण देत त्यांनी सांगितले कि, पिण्याचे पाणी, लिफ्ट, दिवे या सामान्य उपयोग्याच्या बाबी ते सौर ऊर्जेने चालवितात. या सोसायटीतील लोकानी सोलर पॅनल बनवून, दरवर्षी ते ९० हजार किलोवॅट तासाला निर्मिती करतात. यामुळे प्रत्येक महिन्याला ४० हजार रुपयांची बचत होते. तर दिसूमध्ये सौरऊर्जेमुळे ५२ कोटी रुपयांची बचत झाल्याचे उदाहरण आहे असे ते म्हणाले. यावरून आपण निसर्ग आणि पर्यावरण याविषयी कसे संवेदनशील आहोत हे सुद्धा दाखवले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे हे खरे दरोडेखोर!

प्रियांका गांधींनी केले परिवारवादाचे समर्थन; म्हणाल्या, श्रीराम, पांडवही परिवारासाठीच लढत होते!

वैभव मांगले म्हणतोय ‘भय इथले संपत नाही!’

कॅगचा अहवाल आला; महापालिकेवर दरोडा टाकणाऱ्यांचा बुरखा फाटणार

महिला विकासाची जादू

पुढे निर्माता गुनित मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांची नावे घेत ‘द एलिफंट व्हिसपरर्स ‘ या माहितीपटासाठी ऑस्कर जिंकून देशाची मान उंचावली आणि देशाचा गौरव झाला असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. पुढे त्यांनी नमूद केले कि ७५ वर्षात नागालँड मध्ये प्रथमच दोन महिल्या जिंकल्या आणि राज्यसभेत पोचल्या आहेत. तर एक मंत्रीही झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

तुर्कीतील भूकंपग्रस्त लोकांच्या मदतीसाठी एन डी आर एफ या दलातील शूर महिलांची त्यांनी अलीकडेच भेट घेतल्याचे सांगितले. तर ग्रुप कप्तान शालिजा धामा या कॉम्बॅट युनिटमध्ये कमांड मिळवणारी पहिली महिला आहे जिने हवाई दल अधिकारी ठरली असून तिने ३००० तास उड्डाणाचा अनुभव पूर्ण केला आहे. तर कॅप्टन शिव चौहान यांचा उल्लेख करून त्या सियाचीनमध्ये तैनात झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या असून त्या उणे साठ अंशापर्यंत तीन महिने राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘महिला विकासाची ही जादू म्हणजे विकसित भारताचा प्राणवायू’ असल्याचे मोदी म्हणाले.

१००व्या भागासाठी सूचना करा!

शेवटी मोदींनी ‘मन की बात’ मध्ये आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाकडे मागे वळून बघत , ३० एप्रिलला शंभराव्या भागाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद असल्याचे सांगितले. त्या भागासाठी लोकांच्या सूचना आणि विचार जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या सूचना आणि कल्पना हा भाग संस्मरणीय बनवतील शिवाय काही ठिकाणी कोरोनाची प्रकरणे वाढत असून स्वच्छता आणि काळजी घ्यावी असे पंतप्रधानानी शेवटी आवाहन केले आहे.

Exit mobile version