पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मार्फत बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. डिसेंबर २०२१ पासून ते मार्च २०२२ पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. देशातील गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे
कोविड महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलेले असतानाच देशात लॉकडाऊन लावण्यात आला. अशा परिस्थितीत ७ जून २०२१ रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा केली. देशाचे आर्थिक चक्र बंद असताना गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी ही योजना अतिशय महत्वपूर्ण ठरली.
हे ही वाचा:
मंदिर तोडले कट्टरवाद्यांनी, दंड भरतोय हिंदू समाज
परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती
विलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?
या योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा अनुक्रमे एप्रिल ते जून २०२० आणि जुलै ते नोव्हेंबर २०२० या काळामध्ये कार्यान्वित झाला. तर तिसरा टप्पा मे २०२१ ते जून २०२१ या कालावधीत पार पडला. या योजनेचा चौथा टप्पा जुलै २०२१ पासून सुरु झाला असून तो या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर २०२१ पर्यंत लागू आहे. अशातच या योजनेचा चौथा टप्पा संपायला अवघे ५ दिवस शिल्लक असतानाच सरकारने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही योजना मार्च २०२२ पर्यंत कार्यान्वयीत असेल.